Delhi News : राज्यात मराठा आरक्षणावरून रान पेटले असताना आता धनगर आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी धनगर समाजही आक्रमक झाला आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडायचा असेल तर कोठ्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे. तशा पद्धतीचा अधिकार केंद्र सरकारला असल्याचे रासपचे नेते तथा मंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट केले, तर दुसरीकडे सध्या आम्ही एनडीएसोबत आहो; पण इंडियासोबतही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माझ्याशी काहीही बोलणे झाले नसल्याचेही जानकरांनी सांगितले. (Latest Political News)
'राज्यात धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे सरकारला आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा लागणार आहे. अनेक ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलने केली जात आहेत. फडणवीस सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, पण नंतरच्या सरकारच्या काळात निधी दिला गेला नाही. परिणामी तो प्रश्न पुन्हा 'पेंडिंग' पडला. त्यामुळे आता हे सरकार धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवेल असे वाटते,' असेही जानकर म्हणाले. (Maharashtra Political News)
सध्या आम्ही 'एनडीए'सोबत आहोत, पण 'इंडिया'सोबतदेखील आम्ही चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे जानकरांनी स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी विजय वडेट्टीवार यांनी चहापाण्यासाठी मला बोलवले होते. मात्र, राजकीय चर्चा झाली नाही. अशा पद्धतीचे वक्तव्य करून दोन्ही पक्षांसोबत आपली चर्चा सुरू असल्याचा 'मेसेज' जानकर Mahadev Jankar यांनी दिला आहे. दरम्यान, राज्यात एस.टी.त समावेश करण्यासाठी १७ सप्टेंबरपासून राज्यात धनगर समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा नांदेडच्या बैठकीत निर्णय झाला आहे.
राज्यात रासप लोकसभेच्या तीन जागा लढणार आहे. त्या जागांवर तशी तयारी सुरू केली आहे. भाजपसोबत चर्चा करण्यासाठी गरज पडलीच तर माझी बहीण पंकजा मुंडे बोलेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जानकर यांनी 'एनडीए'सोबत आहोत, पण 'इंडिया'सोबत जाण्याची तयारी दर्शविल्याने जानकर यांच्या मनात काय सुरू आहे व येत्या काळात त्यांची भूमिका काय असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.