
Indian Army's Counter to Donald Trump : भारत आणि अमेरिकेतील दरी आता वाढतच चालली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर नुकतेच 25 टक्के आयातशुल्क लावले अन् त्याची अंमलबजावणीही सुरू केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भारताला हे शुल्क वाढविण्याची धमकी दिली आहे. त्यावर काही तासांतच भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून ट्रम्प यांच्यावर जोरदार प्रहार केला. त्यापाठोपाठ आता भारतीय लष्करही सरसावले आहे.
भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडने सोशल मीडियात एक पोस्ट करत अमेरिकेवर पलटवार केला आहे. या पोस्टमध्ये एका वृत्तपत्रातील 1997 च्या बातमीचे कात्रण जोडण्यात आले आहे. तसेच पोस्टमध्ये म्हटले आहे की, 1954 पासून 1971 पर्यंत अमेरिकेने पाकिस्तानला दोन अब्ज डॉलरच्या शस्त्रांचा पुरवठा केला होता.
भारतीय लष्कराने ही पोस्ट करताना ‘या दिवशी त्यावर्षी’ (This Day That Year) युध्दाच्या तयारीचे वर्ष – 5 ऑगस्ट 1971’ असे कॅप्शन दिले आहे. लष्कराच्या पोस्टमधील चीनच्या मदतीचाही उल्लेख आहे. बीजिंगकडूनही युध्दापूर्वी पाकिस्तानला मदत पोहचविण्यात आली होती, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. तत्कालीन संरक्षण मंत्र्यांनी राज्यसभेत केलेल्या विधानांवरून त्यावेळी हे वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी भारतावर गंभीर आरोप केले. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करत असून त्यातील मोठा हिस्सा आंतरराष्ट्रीय बाजारात विकून फायदा कमवत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. तसेच त्यांनी आणखी टेरिफ वाढविण्याची धमकीही दिली होती.
ट्रम्प यांच्या या आरोपांना काही तासांतच केंद्र सरकारनेही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. रात्री उशिरा परराष्ट्र मंत्रालयाकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाचे पवक्ते रणधीर जयस्वाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले होते की, भारतावर निशाणा साधणे केवळ चुकीचेच नाही तर या देशांची विधाने आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये फरक दर्शवितो.
रशियाकडून तेल खरेदी करण्यावाचून भारताकडे पर्याय ठेवण्यात आला नव्हता. कारण युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतर पारंपरिक पुरवठादारांनी आपला पुरवठा यूरोपकडे वळवला होता. त्यावेळी अमेरिकेनचे भारताला असे पाऊल उचलण्यासाठी प्रोत्साहित केले होते. जगातील इंधन बाजार स्थिर राहावा, यासाठी अमेरिकेनेच हा पर्याय सुचवला होता, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.