Narendra Modi : मला मोठी किंमत चुकवावी लागेल, पण मी तयार! पंतप्रधान मोदींचं मोठं विधान, 24 तासांत पलटवार

Narendra Modi's Bold Stand on Farmers' Interests : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के आयातुशुल्क लादले आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी अप्रत्यक्षपणे ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.
Narendra Modi And Donald Trump
Narendra Modi And Donald TrumpSarkarnama
Published on
Updated on

Impact of U.S. Tariffs on Indian Agriculture : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण 50 टक्के आयातशुल्क लादल्याने खळबळ उडाली आहे. याचा मोठा फटका अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय उत्पादनांना बसणार आहे. ट्रम्प यांच्या टेरिफ बॉम्बला आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी ट्रम्प यांचे नाव न घेता आता त्यांच्यासमोर झुकायचे नाही, अशी भूमिका अप्रत्यक्षपणे घेतल्याचे दिसते.

ट्रम्प यांच्या धमक्यांना यापूर्वीच परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रत्युत्तर देण्यात आले होते. आता खुद्द पंतप्रधान मोदींनीही त्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. भारत आपले शेतकरी, पशुलापक आणि मच्छीमारांच्या हितांशी समझोता करणार नाही, त्यासाठी कोणतीही मोठी किंमत चुकवावी लागली तरी चालेल, असे मोदींनी म्हटले आहे.

दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी ट्रम्प यांचे नाव घेतले नाही. पण त्यांचे विधान थेट ट्रम्प यांच्या धमक्यांना उद्देशून असल्याचीच चर्चा आहे. ट्रम्प यांनी बुधवारी रात्री भारतावर आणखी 25 टक्के टेरिफबॉम्ब टाकला. त्याआधीही 25 टक्के टेरिफ लागू झाले आहे. त्यामुळे एकूण टेरिफ 50 टक्के झाले आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे विधान महत्वपूर्ण मानले जात आहे.

Narendra Modi And Donald Trump
Uddhav Thackeray: VVPAT बंद करतात, मग निवडणूका कशाला घेतात? उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला विचारला जाब

काय म्हणाले पंतप्रधान?

शेतकरी, पशुपालक, मच्छीमारांच्या हितासाठी भारत कोणताही समझोता करणार नाही. मला वैयक्तिक मोठी किंमत चुकवावी लागेल, हे माहिती आहे. पण त्यासाठी मी तयार आहे. भारत आपल्या शेतकऱ्यांसोबत ठामपणे उभा आहे. त्यांच्या कल्याणासाठी काहीही करण्याची माझी तयारी असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.

Narendra Modi And Donald Trump
Donald Trump Tariff Hike : "राष्ट्रीय हितासाठी..."; ट्रम्प यांनी 50 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेताच भारतानेही स्पष्ट केली आपली भूमिका

परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध केला आहे. मंत्रालयाने बुधवारी रात्री उशिरा प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘डोनाल्ड ट्रम्प यांचा टेरिफचा निर्णय अयोग्य, अन्यायपूर्ण आणि तर्कहीन आहे.’ दरम्यान, ट्रम्प यांच्याकडून भारताला सातत्याने धमकावले जात आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, यासाठी ट्रम्प यांच्याकडून दबाव टाकला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com