India Nuclear Capability : भारताची ताकद वाढली, पाकला धडकी भरणार; अण्वस्त्रांबाबत नवा रिपोर्ट समोर

SIPRI 2025 Report Insights : स्टॉकहॉम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या नव्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे.
An overview of India's nuclear arsenal as per the latest SIPRI report, highlighting its 180 nuclear warheads and strategic growth.
An overview of India's nuclear arsenal as per the latest SIPRI report, highlighting its 180 nuclear warheads and strategic growth. Sarkarnama
Published on
Updated on

Strategic Importance of India's 180 Nuclear Warheads : भारतासोबतच्या संघर्षादरम्यान पाकिस्तानातील नेत्यांकडून वारंवार आण्विक हल्ल्याची धमकी दिली जात होती. पण आता नव्या रिपोर्टनुसार भारताची अण्वस्त्र सज्जता वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही बातमी पाकिस्तानला धडकी भरवणारी आहे. भारतातील अण्वस्त्रांची संख्या 180 वर पोहचल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

स्टॉकहॉम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या नव्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. अण्वस्त्रांची संख्या वाढण्याबरोबरच न्यूक्लिअर डिलिव्हरी सिस्टीम म्हणजेच ही शस्ज्ञत्रे वाहून नेणाऱ्या मिसाईल्सची संख्याही वाढत आहे. सिप्रीच्या अहवालानुसार भारत वेगाने अण्वस्त्रांची संख्या वाढवत आहे.

भारताकडे यावर्षी अण्वस्त्रांची संख्या 180 वर पहोचली आहे. मागील वर्षी हा आकडा १७२ होता. सिप्रीच्या अहवालानुसार, पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्र आहेत. भारताकडून एक नवीन न्यूक्लिअर सिस्टीम विकसित केली जात असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्यासाठी केला जात आहे.

An overview of India's nuclear arsenal as per the latest SIPRI report, highlighting its 180 nuclear warheads and strategic growth.
Air India crash survivor : मागे आगीचे लोळ अन् हातात मोबाईल..! विमान अपघातातून बचावलेल्या रमेश यांचा थरारक व्हिडीओ व्हायरल

भारताकडे सर्वाधिक अत्याधुनिक मिसाईल्समध्ये अग्नी प्राईम आणि मल्टीपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल सक्षम अग्नी-५ मिसाईलचा समावेश होतो. भारतीय संरक्षण मंत्रालयानुसार, अग्नी प्राईम हे अग्नी सीरिज मिसाईलपैकी सर्वाधिक अत्याधुनिक आहे. याची रेंज १ ते २ हजार किलोमीटर एवढी आहे. मागील वर्षी भारताने एमआयआरव्ही सक्षम अग्नी-५ ची यशस्वीपणे चाचणी केली होती. हे मिसाईल पाच हजार किलोमीटरवरून लक्ष्य भेदू शकते.

सिप्रीच्या अहवालामध्ये पाकिस्तानकडूनही अण्वस्त्रांमध्ये वाढ केली जात असल्याचे म्हटले आहे. पाकने २०२४ मध्ये अण्वस्त्र तयार करण्यासाठी आवश्यक सामुग्रीची जमवाजमव केली होती, असे अहवालात म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षाबाबत सिप्रीने चिंता व्यक्त केली आहे.

An overview of India's nuclear arsenal as per the latest SIPRI report, highlighting its 180 nuclear warheads and strategic growth.
Air India crash survivor : मागे आगीचे लोळ अन् हातात मोबाईल..! विमान अपघातातून बचावलेल्या रमेश यांचा थरारक व्हिडीओ व्हायरल

अण्वस्त्र ठेवलेल्या ठिकाणी हल्ला आणि चुकीच्या माहितीमुळेही आण्विक युध्दाचा भडका उडू शकतो, असे सिप्रीचे मट कोरडा यांनी म्हटले आहे. अण्वस्त्रांवर आपला भर वाढविणाऱ्या देशांसाठी हा इशारा असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, इराण आणि इस्त्रायल युध्दाच्या पार्श्वभूमीवरही आण्विक युध्दाची भीती व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com