Operation Sindoor : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले होते. या मोहिमे अंतर्गत पाक व्याप्त काश्मीरमधील अनेक दहशवाद्यांचे तळ भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले.
या कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र, तो भारतीय लष्कराने परतवून लावला होता. मात्र, ऑपरेशन सिंदूरबाबात माहिती देताना काही विदेशी माध्यमांनी भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानने देखील प्रतिहल्ला केल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या होत्या.
याच बातम्यां संदर्भात देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. या कारवाईत भारताचं काहीही नुकसानं झालेलं नाही, जे नुकसान झालं म्हणतात त्यांनी साधा एक फोटो दाखवावा असं, डोवाल यांनी म्हटलं आहे.
आईआईटी मद्रास येथील एका कार्यक्रमात बोलताना डोवाल म्हणाले की, "परदेशी माध्यमांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या. मला असा एक फोटो दाखवा ज्यामध्ये भारताचे नुकसान झाले आहे. या काळात भारताचे कसलही नुकसान झाले नाही. तंत्रज्ञान आणि युद्ध यांच्यातील संबंध नेहमीच महत्त्वाचा असतो.
आम्हाला ऑपरेशन सिंदूरचा अभिमान असून हे ऑपरेशनसाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केल्याचाही गर्व असल्याचं डोवाल म्हणाले. तसंच, आम्ही पाकिस्तानच्या 9 ठिकाणांवर हल्ला करण्याचं ठरवलं होतं. यापैकी एकही लक्ष्य सीमावर्ती भागात नव्हते. आमचं सर्व टार्गेट अचूक होते. आम्ही फक्त दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याचंही डोवाल यांनी यावेळी स्पष्ट केलं.
तर, ऑफरेशन सिंदूरची कारवाई 23 मिनिटे चालली. या सर्व कारवाईनंतरचा मला असा एक फोटो दाखवा ज्यामध्ये भारताचं काही नुकसान झालं आहे. एवढंच काय या काळात साधी एक काच देखील फुटलेली नाही.
मात्र, परदेशी माध्यमांनी बरेच काही सांगितले. काही निवडक फोटोंच्या आधारे त्यांनी पाकिस्तानच्या 13 एअरबेसबद्दल बरीच चर्चा केली. पण 10 मे च्या आधी आणि नंतर पाकच्या 13 एअरबेसचे सॅटेलाइट फोटो पाहा, सर्व चित्र स्पष्ट होईल, असंही ते यावेळी म्हणाले.
22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने 7 मेच्या मध्यरात्री 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले. या अंतर्गत, भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले.
या कारवाईनंतर पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्करी आणि नागरी वस्त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैन्याने तो हाणून पाडला. तर जवळपास दिवसांच्या लष्करी चकमकीनंतर, 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.