India Pakistan war tensions
India Pakistan war tensionsSarkarnama

India Pakistan war tensions : भारत-पाकिस्तानात कमालीचा तणाव; व्यापार सीमा बंद, महागाईचा भडका उडणार

India-Pakistan War Tensions May Impact Trade and Increase Inflation in India : भारताने दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याने पाकिस्तानमध्ये भारतावर ड्रोन हल्ले सुरू केले असून, त्याचा परिणाम व्यापारावर झाला आहे.
Published on

India Pakistan trade impact : भारत-पाकिस्तानमध्ये युद्धस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने ड्रोन हल्ले वाढवले असून, त्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. यातच पाकिस्तानने सीमालगत असलेल्या भागातील नागरी वसाहतींना लक्ष केल्याने, दोन्ही देशांमधील परिस्थिती आणखीच चिघळली आहे.

याचा परिणाम देशांतर्गत व्यापारावर होऊन, तो बंद झाल्याने महागाई वाढण्याची शक्यता आहे. भारत-पाकिस्तान व्यापारी मार्ग बंद झाल्याने अफगाणिस्तानवरून येणारा सुकामेवा देशात येणं बंद झालं आहे. त्यामुळे सुकामेवा भविष्यात महाग होण्याची संकेत आहेत.

भारत (India) आणि पाकिस्तानमध्ये युद्ध स्थिती टोकाची आहे. भारताने पाकिस्तानसोबतचा व्यापारी मार्ग बंद केला आहे. वाघा-अटारी सीमा यापूर्वीच बंद करण्यात आली आहे. भारताला आता पाकिस्तानला वगळून लांब पल्ल्याच्या मार्गाने शेतीमालाची निर्यात करावी लागणार आहे. त्यामुळे निर्यात खर्चिक होणार आहे.

India Pakistan war tensions
Balochistan attacks : पाकिस्तानच्या लष्करावर सहा हल्ले, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं घेरलं; दिल्लीत दूतावासाची मागणी

भारतातून कापूस, साखर, फळे, भाजीपाला तसेच हळद, जिरा, कांदा, धने, बडीशेप, इलायची, काजू, शेंगदाणा, खोबऱ्यासह इतर मसाल्याचे पदार्थ पाकिस्तानमार्गे (Pakistan) निर्यात होतात. हरभरा, मसूर, राजमासह कडधान्य तसेच सोयाबीन पेंडेसह इतर तेलबिया पेंडेची निर्यात आखाती आणि सोवियत संघातील देशांना होते. या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. लांब पल्ल्याच्या मार्गाने निर्यात करावी लागणार असल्याने त्याचा खर्च वाढला आहे. परिणाम महागाईचे ढग दाटून येण्याची अधिक शक्यता आहे.

India Pakistan war tensions
Amritsar drone strike : सुवर्णमंदिर असलेल्या अमृतसरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न; पाकिस्तानाच्या कुरापती, भारताचं जोरदार प्रत्युत्तर, संयम कधीही संपू शकतो...

या युद्धजन्य स्थितीत अफगाणिस्तानवरून भारतात येणारा सुकामेवा देशात येणे बंद झाले आहे. परिणामी, सुकामेव्याचे भाव भविष्यात वाढण्याची चिन्हं आहेत. यातच बांगलादेशाने देखील कांदा, संत्री आयातीवर जानेवारीपासूनच शुल्क लागू केले आहे. त्यामुळे या वस्तूंच्या देशांतर्गत किमती वाढण्याची शक्यता निर्यातदारांनी वर्तविली आहे.

भारत व पाकिस्तानमधील संघर्षांच्या पार्श्वभूमीवर अटारी येथील एकात्मिक तपासणी नाका (आयसीपी) तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अटारी येथील भू-बंदराद्वार अफगाणिस्तानमधून सुकामेवा, खजूर, जिप्सम, सिमेंट, काच, रॉक मीठ आणि औषधी वनस्पती यासारख्या वस्तू आयात करतो. अफगाणिस्तानचा माल भारतात येतो.

भारत-पाकिस्तानमध्ये सध्या कमालीचा तणाव असल्यामुळे हा व्यापार बंद झाला आहे. सुके जर्दाळू, बदाम, काळे आणि हिरवा मनुका, पिस्ता, अक्रोड याची आयात कमी झाल्यास देशांतर्गत या सुकामेव्याचे भाव वाढू शकतात. पाकिस्तानाची सीमा बंद असल्याने सुकामेवा भारतात आणायचा असेल, तर इराणमार्गे आणावा लागेल, त्यासाठी एक महिना उशीर लागतो. पण पाकिस्तानच्या रस्ते मार्गानं अवघ्या तीन-चार दिवसांत वाहतूक होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com