Balochistan attacks : पाकिस्तानच्या लष्करावर सहा हल्ले, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं घेरलं; दिल्लीत दूतावासाची मागणी

Balochistan Attacks Pakistan Army Amid Independence Demand and India-Pakistan War Tensions : भारत-पाकिस्तान तणावात बलुचिस्ताननं स्वातंत्र्याची मागणी करत पाकिस्तानच्या लष्करावर सहा ठिकाणी हल्ले चढवले आहे.
Balochistan attacks
Balochistan attacksSarkarnama
Published on
Updated on

Balochistan conflict 2025 : भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष सुरू असतानाच, बलुचिस्तानमध्येही तणाव वाढला आहे. 'बलुचिस्तान लिबरेशन आर्मी' (बीएलए) पाकिस्तान लष्कराविरोधात आक्रमक झाले आहे.

'बलुचिस्तान लिबरेशन आर्मी'ने गुरूवारपासून पाकिस्तानवर हल्ले सुरू ठेवले असून, आजही पाकिस्तान लष्कर असलेल्या सहा ठिकाणी हल्ले चढवले. यात काही पाकिस्तान सैनिक ठार झालं असून, त्याला दुजोरा मिळू शकलेला नाही. या हल्ल्याची माहिती मात्र स्थानिक रेडिओवरून सांगण्यात आले.

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. भारताच्या (India) हवाई दलाने एअर स्ट्राइक करत 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत, पाकिस्तानस्थित असलेल्या नऊ दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर भारत-पाकिस्तान युद्धस्थिती निर्माण झाली असून, पाकिस्तानने ड्रोन हल्ले सुरू केले आहे. तुर्की देशाने पाकिस्तानला ड्रोन विकत असल्याचे समोर येत आहे.

Balochistan attacks
Amritsar drone strike : सुवर्णमंदिर असलेल्या अमृतसरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न; पाकिस्तानाच्या कुरापती, भारताचं जोरदार प्रत्युत्तर, संयम कधीही संपू शकतो...

पाकिस्तानला (Pakistan) घेरण्याची रणनीती भारताकडून आखली गेली असून, त्यात भारताना चांगलच यश येताना दिसत आहे. पाकिस्तानचे ड्रोन हल्ला भारतीय लष्कराने निष्फळ ठरवत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यामुळे पाकिस्तान हतबल झाला असून, नापाक इरादे आखताना दिसत आहे. नागरी विमानांच्या आडून हल्ले सुरू केले आहे. या नापाक इराद्यांमध्ये आता बलुचिस्तानमधील खदखदही समोर येत आहे. स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीने भारत-पाकिस्तान संघर्षात डोके वर काढले असून, पाकिस्तानची यामुळे डोकेदुखी वाढली आहे.

Balochistan attacks
India Vs Pakistan Live : पाकिस्तानची ‘ती’ ढाल आडवी आली अन् भारताने दाखवला संयम, नाहीतर..!

बलुचिस्तानमधील सशस्त्र गटांचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. बलुचिस्तानच्या मोठ्या भागावर या गटांनी ताबा घेतल्याचा दावे केले जात आहे. 'बलुचिस्तान लिबरेशन आर्मी'न (बीएलए) पाकिस्तानी सैन्यांवर आणि ठिकाणांवर हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांना अधिकृत दुजोरा मिळत नसला, तरी स्थानिक रेडिओंवर याची माहिती दिली गेल्याची समोर आली आहे.

'बलुचिस्तान लिबरेशन आर्मी'चे हल्ले

'बलुचिस्तान लिबरेशन आर्मी'चे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत असतानाच, 'तुमचा जीव वाचवायचा असेल, तर बलुचिस्तान सोडा,' असे आवाहन या गटाने केले आहे. बलुचिस्तानचा ध्वज घेतलेले फोटोही व्हायरल झाले आहेत. बलुचिस्तानच्या मोठ्या प्रदेशावर या सशस्त्र गटांनी ताबा घेतलेला दिसतो. पाकिस्तानचे सरकार आणि लष्कर बलुचिस्तानच्या मोठ्या प्रदेशावरून पकड गमावत असल्याचे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहीद खाकन अब्बासी यांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांकडे हस्तक्षेपाची मागणी

दरम्यान, बलुचिस्तानमधील प्रसिद्ध लेखक मीर यार बलोच यांनी स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करत दिल्लीमध्ये बलुच दूतावास सुरू करण्याची परवानगी भारताने द्यावी, असे आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्रांनी स्वतंत्र बलुचिस्तानला मान्यता द्यावी. यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांची बैठक बोलवावी, बलुचिस्तानात शांतिसेना पाठवावी आणि पाकिस्तानी लष्कराने हा प्रदेश रिकामा करावा, अशी मागणीही केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com