
Navi Delhi News : पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थितीनंतर शस्त्रविराम झाला. पण याची घोषणा करताना ट्रम्प यांनी ट्विट करत काश्मीर प्रश्नावरही तोडगा काढणार असे म्हटलं होतं. त्यावरून आता परराष्ट्र मंत्रालयाने आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. तसेच पाकिस्तानह अमेरिकेला देखील इशारा दिला आहे. भारताने सध्या शस्त्रविराम केला असला तरीही भारत-पाकिस्तानातील समस्या द्विपक्षीय करार पद्धतीनेच सोडवली जाईल. यात बाहेरच्या कुणाचीही मध्यस्थी आम्हाला मान्य नसल्याचे म्हटलं आहे. याबाबात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल माहिती दिली.
रणधीर जयस्वाल यांनी, भारत आणि पाकिस्तान यांनी जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित कोणतेही प्रश्न द्विपक्षीय पद्धतीने सोडवले पाहिजेत यावर आम्ही ठाम आहोत. या धोरणात कोणताही बदल नाही. याआधीही 26/11च्या वेळी आम्ही पाकिस्तानला योग्य उत्तर दिलं आहे. यावेळीही आम्ही चोख उत्तर दिलं असून पाकिस्तान थांबला तर भारत थांबेल. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेल्या भारतीय भूभाग आधी रिकामा करावा, हा प्रश्नही सध्या प्रलंबित असल्याचे ते म्हणाले.
यामुळे आम्हाला काश्मीरच्या मुद्द्यावर कुणाच्याही मध्यस्थीची गरज नाही आणि तशी मध्यस्थी केलेले मान्यही नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींमध्ये याबाबत चर्चा झाली आहे. यामुळे जम्मू काश्मीरमधील प्रश्न द्विपक्षीय चर्चेनेच सोडवले जातील असंही रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे.
तसेच जयस्वाल यांनी, सिंधू जलवाटप कराराला देण्यात आलेली स्थगिती कायम राहील, असे पाकिस्तानला ठणकावलं आहे. भारताने चांगली भावना आणि मैत्रिपूर्ण संबंधामुळे आजपर्यंत सिंधू जलवाटप करार सुरू ठेवला. मात्र पाकिस्तानने अनेक दशकांपासून दहशतवादाला खतपाणी घातले. त्यांनी सिंधू जलवाटप कराराला हरताळ फासला. त्यामुळे सीसीएसच्या निर्णयानुसार जोपर्यंत सीमेपलिकडचा दहशतवाद थांबत नाही. तोपर्यंत सिंधूचे पाणी सोडले जाणार नाही. सिंधू करार स्थगितच राहील असेही स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्रालयाने दिलं आहे.
पाकिस्तानची सवयही पराभव समोर दिसल्यास ढोल वाजवण्याची आहे. त्यांनी पहगाममध्ये हल्ला केला. भारताच्या सीमेवरही गोळी वार केला. यानंतरच भारताने पाकमधील तळांना टार्गेट करत हवाई तळ नेस्तनाबूत केले. आता त्यांनी गोळीबार केल्यास त्यांनी गोळीनेच उत्तर दिलं जाईल असाही इशारा पाकिस्तानला भारताने यावेळी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.