

India Pakistan conflict : पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पाकची चहूबाजूंनी कोंडी करण्यासाठी भारताना रणनीती आखली आहे.
त्यामध्ये सिंधु जल करार स्थगिती, वाघा अटारी बॉर्डर बंद करणे यासह पाकिस्तानी जहाज आणि भारत-पाक पोस्ट सेवा बंद करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काहीही झालं तरी हल्लेखोरांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे.
भारताच्या याच आक्रमक भूमिकेमुळे आता पाकिस्तानची घाबरगुंडी उडाल्याचं दिसत आहे. कारण आता भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानने आपला बचाव करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. कारण पाकिस्तान आता युद्धाच्या मूडमध्ये आला असून भारतीय सैन्याचा सामना करण्यासाठी POK मध्ये बंकर तयार करायला सुरूवात केली आहे.
इतकंच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांना घरे सोडायला लावून त्यांच्या घरांमध्ये पाकिस्तानी सैन्याची चौकी बनवली जात आहे. युवकांना हत्यारांचे ट्रेंनिग देण्यासह खैबर पख्तूनख्वा या सारख्या संवेदनशील भागात वॉर सायरन देखील लावण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
त्यामुळे भारताने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पाकिस्तान घाबरल्याचं दिसत आहे. एकीकडे भारताला पोकळ धमकी देण्याचं सत्र सुरू आहे तर दुसरीकडे पाकिस्तान जगातील इतर देशांकडे सुरक्षेची याचना करत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.