Election Commission : बिहारप्रमाणे निवडणूक आयोगाचा देशभरात धडाका…? 'एसआयआर' मोहीम राबविण्याच्या हालचाली

Voter List Verification: बिहारप्रमाणेच संपूर्ण देशभरात मतदार याद्यांच्या पडताळणीसाठी एसआयआर मोहीम राबविण्यासाठी निवडणुक आयोगाने हालचाली गतिमान केल्या आहे. बिहार निवडणुकीनंतर निर्णय घेतला जाऊ शकतो.
voter list verification
voter list verificationSarkarnama
Published on
Updated on

Political News : बिहारमधील मतदार पडताळणीच्या प्रयोगानंतर आता संपूर्ण देशभरात मतदार याद्यांच्या पडताळणीसाठी विशेष मोहीम (एसआयआर) राबविण्यासाठी निवडणूक आयोगाने हालचाली सुरु केल्या आहेत. बुधवारी आयोगाने देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची परिषद बोलावून या मोहिमेवर सविस्तर चर्चा केली.

बिहारमध्ये अलीकडेच केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) ही मतदार पडताळणीची विशेष मोहीम राबवली. या मोहिमेवरून विविध राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असून सर्वोच्च न्यायालयातही आयोगाच्या मोहिमेस विविध याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले. दरम्यान आता आयोगाने देशभरातील अन्य राज्यांमध्येही 'एसआयआर' अर्थात मतदार पडताळणीची मोहीम राबविण्यासाठी पुढे पाऊल टाकले आहे.

देशपातळीवर या मोहिमेला किमान चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता असल्याने समजते. तसेच बिहार विधानसभा निवडणुकीनंतर 'एसआयआर'ला सुरुवात करण्याी घोषणा होऊ शकते. पुढील वर्षी आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरी या पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी ही देशव्यापी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

voter list verification
Maratha Reservation : मराठा समाजासाठी खुशखबर ! हैदराबाद गॅजेटनंतर सरकारकडून आणखी एक गॅझेट लागू करण्याच्या हालचाली

यासंदर्भात उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत राज्यांतर्गत आवश्यक असलेली कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहे. महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील मतदार संख्येतील ४५ लाख मतांची तफावत असल्याचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेले आरोप तसेच कर्नाटकमधील मतदार याद्यांमधील कथित गोंधळाचे दावे आणि बिहारमध्ये ६२ लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे झालेले आरोप पाहाता आता संपूर्ण देशभरात मतदार याद्यांची पडताळणी करण्याचे स्पष्ट सूतोवाच केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे काल दिल्लीत झालेल्या तिसऱ्या मुख्य निवडणूक अधिकारी परिषदेत देण्यात आले.

voter list verification
Beed Crime : मयत माजी उपसरपंच बर्गे प्रकरणात धक्कादायक वळण, भाच्यापाठोपाठ आता मित्राचाही नवा गौप्यस्फोट; म्हणाला, 'नर्तकी पूजाने त्यांना...'

मतदार यादीतून पात्र नागरिक वगळले जाऊ नयेत त्याचप्रमाणे अपात्र नागरिकांचा देखील समावेश होऊ नये यासाठी सुचविण्यात आलेल्या कागदपत्रांबाबतही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आपापली मते परिषदेमध्ये मांडली. यापूर्वी झालेल्या 'एसआयआर' मोहिमेनंतर मतदार याद्यांचे संगणकीकरण व संकेतस्थळावर याद्या जाहीर करण्याच्या स्थितीबद्दल त्याचप्रमाणे सध्याचे मतदार आणि मागील 'एसआयआर'मधील मतदार यांची सांगड घालण्याच्या कामाबद्दलही यावेळी चर्चा झाली. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आपापल्या राज्यांमधील, तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील मतदारांची संख्या, मागील मतदार पडताळणी मोहिमेचा पात्रता दिनांक आणि मतदार यादी याबद्दल अधिक तपशीलवार माहिती दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com