Indian Army Chief Upendra Dwivedi : 'पेजर अ‍ॅटक इस्त्रायलचा मास्टरस्ट्रोक' ; भारत अशा हल्ल्यांपासून कसा वाचू शकतो?

Upendra Dwivedi on Israel pager attack : भारताचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदींनी दिलं उत्तर ; जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत?
Indian Army Chief Upendra Dwivedi : 'पेजर अ‍ॅटक इस्त्रायलचा मास्टरस्ट्रोक' ; भारत अशा हल्ल्यांपासून कसा वाचू शकतो?
Published on
Updated on

Pager attack Masterstroke by Israel : मागील महिन्यात १७ सप्टेंबर रोजी इस्त्रायलने संपूर्ण लेबनानमध्ये एकाचवेळी तब्बल पाच हजार पेजर्समध्ये स्फोट घडवून आणून संपूर्ण जगात खळबळ माजवली होती. या स्फोटांमध्ये तब्बल चार हजार लोक जखमी झाले होते. स्फोटांमुळे हिजबुल्लाहच्या १५०० सैनिकांना हात आणि डोळेही गमावावे लागले. आता इस्त्रायलच्या या पेजर हल्ल्याच्या रणनीतीला भारताचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मास्टरस्ट्रोक म्हटलं आहे.

मंगळवारी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांना या इस्त्रायलच्या पेजर हल्ल्याशी निगडीत प्रश्न विचारला गेला होता. यावर त्यांनी म्हटले की, ज्या पेजरबाबत बोललं जात आहे, त्यास ताइवानच्या कंपनीच्या नावावर तयार केले गेले. यानंतर हंगेरीच्या एका कंपनीने ब्रॅण्ड नावाचा वापर करून ह हे पेजर हिजबुल्लापर्यंत पोहचवले.

Indian Army Chief Upendra Dwivedi : 'पेजर अ‍ॅटक इस्त्रायलचा मास्टरस्ट्रोक' ; भारत अशा हल्ल्यांपासून कसा वाचू शकतो?
India Vs China : चीन सीमेवरील स्थितीबाबत लष्करप्रमुखांचा मोठा दावा; म्हणाले, आम्ही सज्ज!

लष्कर प्रमुखांनी सांगितलं की, युद्धाची सुरुवात लढाईच्या दिवसापासून होत नाही. तर हे त्या दिवसापासून सुरू होते, ज्या दिवसापासून प्लॅन बनवने सुरू होते. पेजर हल्ल्याच्या प्लॅनसाठी अनेक अनेक वर्षांच्या तयारीची आवश्यकता असते. हल्ल्याने हे स्पष्ट झाले की इस्त्रायल यासाठी तयार होते.

Indian Army Chief Upendra Dwivedi : 'पेजर अ‍ॅटक इस्त्रायलचा मास्टरस्ट्रोक' ; भारत अशा हल्ल्यांपासून कसा वाचू शकतो?
Chirag Paswan : ...तर चिराग पासवान मंत्रिपदाचा राजीनामा देणार; वडिलांच्या पावलावर पाऊल टाकणार

जेव्हा लष्कर प्रमुखांना विचारलं गेलं की, भारत पेजर हल्ल्यांपासून कसा वाचू शकतो. यावर त्यांनी सांगितले की, पुरवठा साखळीत व्यत्यय येण्यासारख्या गोष्टी आहेत. यासाठी खूप सावध रहावे लागेल. आपल्या अनेक पातळ्यांवर बारकईनेन निरीक्षण करावे लागेल. पुरवठा साखळीतील गडबडीपासून वाचावं लागेल. तांत्रिक आणि मानवी स्तरावर सखोल चौकशी करावी लागेल, जेणेकरून अशा घटना होवू नयेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com