India Vs China : चीन सीमेवरील स्थितीबाबत लष्करप्रमुखांचा मोठा दावा; म्हणाले, आम्ही सज्ज!

Army Chief Upendra Dwivedi Ladakh : लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन सैन्यामध्ये संघर्षाची स्थिती असल्याचे संकेत लष्करप्रमुखांनी दिले आहेत.
Upendra Dwivedi
Upendra DwivediSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : भारत आणि चीन सीमेवरील स्थितीबाबत लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मोठे विधान केले आहे. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवरील स्थिती संवेदनशील असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांतील सैन्यामध्ये सुरू असलेला सुप्त संघर्ष थांबताना दिसत नाही.

भारत आणि चीनमध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा झाली आहे. त्यातून सकारात्मक संकेत मिळत होते. पण प्रत्यक्ष जमिनीवर या निर्णयांची अंमलबजावणी लष्कर अधिकाऱ्यांना करावी लागते. पण सीमेवर सध्याची स्थिती चिंता वाढवणारी आहे.

Upendra Dwivedi
Supreme Court : मंदिर असो वा दर्गा, हटवायला हवे! बुलडोझर कारवाईवरून सुप्रीम कोर्टाने दाखवला आरसा

लष्करप्रमुख म्हणाले, एप्रिल 2020 पूर्वीची स्थिती पुन्हा यावी, असे आम्हाला वाटते. जोपर्यंत ही स्थिती पुर्वपदावर येत नाही तोपर्यंत सीमेवर संवेदनशील स्थितील असेल. कोणत्याही आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी लष्कर सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तुम्हाला चीनसोबत प्रतिस्पर्धा करावी लागेल. सहकार्य करावे लागेल, अस्तित्व दाखवून द्यावे लागेल, मुकाबलाही करावा लागेल, असे लष्करप्रमुखांनी म्हटले आहे. मे 2020 मध्ये चीन आणि भारतातील सैन्यांमध्ये संघर्ष झाला होता.

आतापर्यंत हा संघर्ष सुरूच आहे. गलवानमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांतील संबंध बिघडले. सीमेवरील संघर्ष थांबेपर्यंत चीनसोबतचे संबंध चांगले होणार नाहीत, हे भारताने स्पष्ट केल्याचेही जनरल द्विवेदी यांनी सांगितले.

Upendra Dwivedi
Chirag Paswan : ...तर चिराग पासवान मंत्रिपदाचा राजीनामा देणार; वडिलांच्या पावलावर पाऊल टाकणार

दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत चर्चेच्या 21 फेऱ्या झाल्या आहेत. त्यानंतर चीनचे सैन्य काही प्रमाणात मागेही हटले आहे. पण भारत त्यांच्यावर देपसांग आणि डेमचोक क्षेत्रातून मागे हटण्याचा दबाव टाकत आहे. दरम्यान, मागील महिन्यांतच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात रशियामध्ये दोन्ही देशांतील तणावाबाबत चर्चा झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com