
India-Pakistan War : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमध्ये घुसून 9 ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यात आले. या कारवाईंनंतर पाकिस्तानकडून भारतीय सीमेजवळील गावांमध्ये भ्याड हल्ले करण्यास सुरुवात केली. त्याला चोख प्रत्युत्तर भारतीय लष्कराने दिले आहे. पाकिस्तान लष्कराने गुरुवार आणि शुक्रवार मध्यरात्री भारताच्या पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रास्त्रांचा वापर करून अनेक हल्ले सुरू केले.
पाकिस्तानच्या या हल्ल्यांना भारतीय लष्कराने प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय लष्कराने अवघ्या चार सेंकदामध्ये ड्रोनच्या सहाय्याने अचूक मारा करत कसे लक्ष भेदले याचा व्हिडिओ लष्कराने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. अवघ्या 14 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये ड्रोनच्या सहाय्याने अचून टार्गेटला टिपले आणि मोठा स्फोट झाल्याचे दिसत आहे.
भारतीय लष्कराच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर देखील अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांचा प्रभावीपणे प्रतिकार करण्यात आला आणि शस्त्रसंधी उल्लंघनांना योग्य प्रत्युत्तर देण्यात आले.भारतीय सैन्य राष्ट्राच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या रक्षणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. सर्व कटकारस्थांनी सामर्थ्याने उत्तर दिले जाईल.
भारताने गुरुवारी रात्री केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानमध्ये घबराट उडाली. पाकिस्तानची राजधानी इस्लाबादमध्ये मोठा स्फोट झाला हा स्फोटो पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्य घरापासून अवघ्या 20 किलोमीटरच्या अंतरावर झाली. मीडिया रिपोर्टनुसार शाहबाज शरीफ यांना बंकरमध्ये लपून बसावे लागले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.