Indian Parliament : खासदारांना घसघशीत पगार वाढ... जोडीला सरकारी तिजोरीतून होतोय बंगला, प्रवास अन् आरोग्यावर कोट्यवधींचा खर्च

Indian Parliament : देशातील खासदारांची काल (25 मार्च) रोजी तब्बल 24 टक्के इतकी घसघशीत पगारवाढ झाली. पगाराबरोबरच त्यांचे भत्ते आणि माजी खासदारांच्या पेन्शनमध्येही वाढ झाली आहे.
PM Narendra Modi .jpg
PM Narendra Modi .jpgSarkarnama
Published on
Updated on

India : राज्यघटनेच्या 106 कलमानुसार संसद सदस्यांना वेतन आणि भत्ते घेण्याचा अधिकार आहे. याच हक्कानुसार, देशातील खासदारांची काल (25 मार्च) रोजी तब्बल 24 टक्के इतकी घसघशीत पगारवाढ झाली. पगाराबरोबरच त्यांचे भत्ते आणि माजी खासदारांच्या पेन्शनमध्येही वाढ झाली आहे.

आता खासदारांना वेतन म्हणून एक लाख 24 हजार रुपये प्रति महिना मिळणार आहेत. याशिवाय भत्ते आणि इतर सुविधांची संख्याही मोठी आहे. तर माजी खासदारांना 31 हजार रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे. विशेष म्हणजे ही पगारवाढ पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे 1 एप्रिल 2023 पासून दिली जाणार आहे.

खासदारांना किती मिळणार वेतन आणि भत्ते?

खासदारांना आता प्रति महिन्याला एक लाख 24 हजार रुपये पगार मिळणार आहे. याशिवाय मतदारसंघातील खर्चासाठी प्रत्येक महिन्याला 87 हजार, कार्यालयीन भत्ता 75 हजार आणि संसदेच्या अधिवेशनाच्या काळात 2500 रुपये दैनंदिन भत्ता दिला जाणार आहे. कार्यालयात एकदा 1 लाख रुपयांचे टिकाऊ फर्निचर आणि 25 हजार रुपयांचे तात्पुरते फर्निचर खरेदी करण्याची एक वेळची सुविधा मिळते.

PM Narendra Modi .jpg
Kangna Ranaut : कंगनाला मारणाऱ्या 'तिचा' संभाजी ब्रिगेड करणार सत्कार!

खासदारांना दिल्या जाणाऱ्या इतर सुविधा :

याशिवाय, त्यांना दिल्लीत सरकारी निवासस्थान दिले जाते. या घरात 50 हजार युनिट वीज व पाणी मोफत दिले जाते. खासदारांना फोन आणि इंटरनेट भत्ताही दिला जातो. खासदारांना सरकारी वाहने, संशोधन आणि कर्मचारी सहाय्यक दिले जातात. संसदेच्या कॅन्टीनमध्ये सवलतीच्या दरात जेवण देखील मिळते.

दरवर्षी स्वतःला आणि कुटुंबियांना देशांतर्गत 24 मोफत उड्डाणे आणि कोणत्याही वेळी मोफत प्रथम श्रेणी रेल्वे प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. यासाठी विशेष पास दिले जातात. खासदारांना रस्त्यावरील प्रवासादरम्यान टोल फ्री प्रवासाची सुविधा दिली जाते.

PM Narendra Modi .jpg
Lok Sabha Election: लोकसभेनंतर 6 पक्ष झाले मालामाल! निधीसंकलनात कोणी मारली बाजी; काँग्रेस कितव्या क्रमांकावर?

खासदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये सर्व वैद्यकीय सुविधा मोफत मिळतात. देशात एखाद्या आजारावर उपचार शक्य नसेल, तर सरकारच्या परवानगीने परदेशातील उपचारांचा खर्च मिळतो. पद सोडल्यानंतरही CGHS अंतर्गत वैद्यकीय सुविधा मिळत राहतात. माजी खासदार आणि त्यांच्या पती/पत्नींनाही मोफत उपचार सुविधा मिळतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com