France India Plane: मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्समध्ये चार दिवस अडकलेले विमान अखेर आज पहाटे मंगळवारी मुंबईत पोहोचले. विशेष बाब म्हणजे या विमानात 300 हून अधिक प्रवासी होते, त्यापैकी बहुतांश प्रवासी भारतीय आहेत.
फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये हे विमान चार दिवस थांबले होते. रविवारी तेथील अधिकाऱ्यांनी विमानाला पुन्हा उड्डाणाची परवानगी दिली होती, त्यानंतर सोमवारी पॅरिसहून उड्डाण घेतले. (Latest Marathi News)
एअरबस ए ३४० हे विमान मंगळवारी पहाटे ४ वाजता मुंबई विमानतळावर पोहोचल्याची माहिती आहे. फ्रान्समधील वॅट्री विमानतळावरून पहाटे अडीच वाजता विमानाने उड्डाण केले. रोमानियाच्या कंपनीचे हे विमान प्रवाशांना घेऊन निकारगुआला जात होते. विमानाने दुबईहून उड्डाण घेतले होते. मानवी तस्करीच्या संशयावरून विमान थांबवण्यात आले होते.
प्राप्त माहितीनुसार, विमानात 276 लोक होते. दोन अल्पवयीन मुलांसह सुमारे 25 प्रवाशांनी आश्रयासाठी अर्ज करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि ते सध्या फ्रान्समध्ये आहेत. आश्रय अर्जांवर रोइजी-चार्ल्स डे गॉ विमानतळावर प्रक्रिया केली जाईल. याआधी विमान सकाळी १० वाजता उड्डाण घेणार होते, मात्र काही प्रवाशांनी त्यांच्या देशात परतण्यास नकार दिल्याने उशीर झाला.
'मानवी तस्करी'च्या संशयावरून पॅरिसपासून 150 किलोमीटर पूर्वेला वॅट्री विमानतळावर फ्रेंच अधिकाऱ्यांनी विमान थांबवले. यानंतर ताब्यात घेतलेल्या 303 प्रवाशांची चौकशी सुरू केली. मानवी तस्करीच्या संशयावरून पॅरिसच्या सरकारी वकील कार्यालयाने सुरू केलेल्या तपासाचा भाग म्हणून ही सुनावणी घेण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.