Sharad Pawar News : आम्ही बंड नाही, तर बसून निर्णय घ्यायचो ; शरद पवारांचा अजित पवारांना टोला...

Rebellion of Ajit Pawar : मागील 10 ते 15 वर्षात बारामती व विभागातील निर्णय न घेतल्याच प्रत्युत्तर
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'आमच्या आधी 38व्या वर्षी बंड करण्यात आले होते, आम्ही 60व्या वर्षी केले' असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी 'आम्ही बंड नाही, तर बसून निर्णय घ्यायचो', असा टोला लगावला आहे. तर गेल्या दहा ते पंधरा वर्षात बारामतीसह विभागात लक्ष न घातल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे (Pune) येथील भीमथडी जत्रेला राष्ट्रवादी (NCP) चे शरद पवार यांनी भेट दिली. जत्रेत त्यांनी विविध स्टॅालला भेट देवून आढावा घेतला. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत 'मी वेगळ व्हायचा निर्णय 60व्या वर्षी घेतला, काहींनी तर 38व्या वर्षी वसंतदादा पाटलांना बाजूला केलं गेलं.

Sharad Pawar
Kolhapur Politics : महाडिक-मुश्रीफांची दिलजमाई ?; दोघांच्या बुलेट राईडने विरोधकांना धडकी

वसंतदादा चांगलं नेतृत्व होतं. त्यांनाही बाजूला केलं गेलं', अशी खोचक टीका शरद पवार यांच्यावर केली होती. त्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, गेल्या 10 ते 15 वर्षात आमच्या बारामतीसह विभागातील कोणताच निर्णय मी स्वत: घेतलेला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंचायत समिती, साखर कारखाने तसेच अन्य संस्था असतील तेथील पदांवर कोणी जावं, कोणी कोणती जबाबदारी घ्यावी, यात मी लक्ष घालत नाही. त्याठिकाणी अजित पवारच निर्णय घेत आहेत. माझ्यावर बंड केल्याचे बोलले जात आहे. पण आम्ही बंड नाही, तर एकत्र बसून निर्णय घ्यायचो. त्यावेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेने आम्ही सर्वांनी बसून निर्णय घेतला आहे. यात कोणतही बंड नसल्याचे पवार यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

Sharad Pawar
Akola : मोदींचा विकसित भारत संकल्प रथ रिधोरा ग्रामस्थांनी अडवला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com