Indo-Pak border crossing : पाकिस्तानातून परतलेल्या भारतीयांचा पहिला आकडा आला समोर; किती पाकिस्तानी गेले? वाचा सविस्तर...

Impact on India-Pakistan Border Relations : अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवले जात आहे. पंजाब पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांचा तगडा बंदोबस्त याठिकाणी आहे.
Attari Border
Attari BorderSarkarnama
Published on
Updated on

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे फर्मान सोडले होते. त्यासाठी आजपर्यंतची मुदत देण्यात आली होती. तर पाकिस्नाननेही भारतीयांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर दोन्ही देशांतील नागरीक मायदेशी परतत असून सर्वाधिक संख्या पाकिस्तानातून येणाऱ्या भारतीयांची असल्याचे समोर आले आहे.

अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवले जात आहे. पंजाब पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांचा तगडा बंदोबस्त याठिकाणी आहे. मागील चार दिवसांत 537 पाकिस्तानी नागरिकांनी अटारी बॉर्डर ओलांडली आहे. तर या चार दिवसांत पाकिस्तानातून मायदेशी परतलेल्या भारतीयांचा आकडा त्याहून अधिक आहे. यादरम्यान जवळपास 850 भारतीय नागरीक पाकिस्तानातून परतले आहेत.

Attari Border
Pakistan Connection : काँग्रेस नेत्याची पत्नी अन् मुले पाकिस्तानी नागरिक? मुख्यमंत्र्यांचा धक्कादायक दावा, 10 सप्टेंबरला करणार धमाका

अटारी बॉर्डरवरील पंजाब पोलिसांचे प्रोटोकॉल अधिकारी अरुण महल यांनी ही माहिती दिली आहे. भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या नागरिकांचा आकडा 24 एप्रिलला केवळ 28 होता. त्यानंतर हा आकडा वाढत गेला. ता. 25 एप्रिलला 191, 26 एप्रिलला 75 तर 27 एप्रिलला 237 पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडला आहे. हा आकडा आणखी वाढणार आहे.

भारतातील पाकिस्तानी नागरिकांपेक्षा पाकिस्तानातील भारतीय नागरिकांचा मायदेशी परतण्याचा वेग अधिक असल्याचे दिसते. ता. 24 एप्रिलला मायदेशी परतलेल्या भारतीयांची संख्या 105 होती. त्यानंतर 25 एप्रिलला 287, 26 एप्रिलला 335 आणि 27 एप्रिलला 116 भारतीय मायदेशी परतले आहेत. हा आकडाही आणखी वाढू शकतो.

Attari Border
Operation Brasstacks : सीमेवर 5 लाख भारतीय सैन्य अन् पाकिस्तानला पळता भूई थोडी!

दरम्यान, भारताने 12 प्रकारच्या व्हिसा धारकांसाठी दिलेली २७ एप्रिलची मुदत आज संपली आहे. तर सार्क व्हिसा असलेल्यांना 26 एप्रिलपर्यंतच मुदत देण्यात आली होती. मेडिकल व्हिसा असलेल्यांना 29 एप्रिलपर्यंतची डेडलाईन असून तर लाँग टर्मचा व्हिसा असलेल्या सवलत देण्यात आली आहे. हिंदू पाकिस्तानी नागरिकांनाही यातून वगळण्यात आले आहे.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना सक्त सूचना दिल्या आहेत. एकाही पाकिस्तानी नागरिकाला राहू देऊ नका, असे खुद्दे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना सूचित केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रासह सर्वच राज्यांमध्ये पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगितले जात आहे. महाराष्ट्रातील सर्व पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटविण्यात आली असून एकही नागरिक बेपत्ता नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com