Waqf Board Bill : "संसदेची नवी इमारत वक्फ जमिनीवर बांधली..." माजी खासदाराचा खळबळजनक दावा

Badruddin Ajmal On Waqf Amendment Bill "वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 साठी गठीत करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीवर (जेपीसी) सर्व धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. पाच कोटी लोकांनी मेसेज पाठवत जेपीसीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केलं आहे."
EX MP Badruddin Ajmal
EX MP Badruddin AjmalSarkarnama
Published on
Updated on

Waqf Amendment Bill : 'संसदेची नवी इमारत वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधल्याचा खळबळजनक दावा आसाममधील जमियत उलेमाचे प्रमुख आणि AIUDF (ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट)चे नेते माजी खासदार मौलाना बदरुद्दीन अजमल (Badruddin Ajmal) यांनी केला आहे.

त्यांच्या या दाव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तर मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकावर (Waqf Amendment Bill) तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवाय या विधेयकाबाबत जनतेत प्रचंड नाराजी असल्याचं म्हटलं आहे.

ते म्हणाले, "वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 साठी गठीत करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीवर (JPC) सर्व धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. पाच कोटी लोकांनी मेसेज पाठवत जेपीसीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केलं आहे. त्यामुळे यावरून या विधेयकाबाबत लोकांमध्ये किती नाराजी आहे, हे दिसून येतं आहे."

EX MP Badruddin Ajmal
S Jaishankar on Pakistan : एस जयशंकर यांनी शहबाज शरीफ यांच्यासमोरच पाकिस्तानला सुनावलं, म्हणाले...

तर एनडी सरकारने आणलेल्या या विधेयकाला आव्हान देण्यासाठी 'जमियत उलेमा-ए-हिंद' आसाममधील वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) जमिनींचे सर्वेक्षण करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. तर देशाची संसदेची नवी इमारत वक्फच्या जमिनीवर बांधल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी यावेळी केला. तसंच वक्फ विधेयकाबाबत कायदेशीर लढा सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी यावळी स्पष्ट केलं.

EX MP Badruddin Ajmal
J&K Oath Ceremony : भाजपला ताकद दिलेल्या जम्मूला अब्दुल्लांकडून मोठं गिफ्ट; काश्मीरमध्ये ऐतिहासिक शपथविधी

भाजप खासदारांची शिवीगाळ?

दरम्यान, सोमवारी आणि मंगळवारी वक्फ विधेयकावर जेपीसीच्या बैठकीत बराच गदारोळ झाला होता. या बैठकीवर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. तर या बैठकीत भाजप (BJP) खासदारांनी शिवीगाळ केल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या खासदारांनी केला. तर याबाबतची तक्रार त्यांनी पत्रद्वारे ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com