BJP Politics भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; प्रदेशाध्यक्षांबाबत पक्षात नाराजीचा सुर

यासंदर्भात एक पत्र जे. पी नड्डा यांनाही पाठवण्यात आले आहे
Bangal  BJP Politics
Bangal BJP Politics Sarkarnama
Published on
Updated on

Bangal BJP Politics : बंगाल भाजपच्या नेत्यांमधील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. माजी आयपीएस अधिकारी आणि पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांपैकी एक भारती घोष, यांनी पक्षाच्या सध्याच्या नेतृत्वावर आणि बंगाल युनिटचे अध्यक्ष सुकांत मजुमदार यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. बंगालमध्ये 30 डिसेंबर रोजी होणाऱ्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'च्या उद्घाटन समारंभाला निमंत्रित न केल्याबद्दल भाजपच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Bangal  BJP Politics
Solapur : सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाची राजकारणात एन्ट्री?

यासंदर्भात एक पत्र पक्षाचे अखिल भारतीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनाही पाठवण्यात आले आहे. यावेळी भारती घोष यांनी पक्षांतर्गत सुरु असलेल्या गोष्टींबाबत गौप्यस्फोट केले आहेत. भाजपच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून भारती घोष यांचा मेसेज लीक झाला आहे. दिलीप घोष प्रदेशाध्यक्ष असताना पक्षात समन्वयाबाबत कोणतीही अडचण नव्हती, मात्र सध्याचे नेतृत्व जाणीवपूर्वक काही नेत्यांना मागे ठेवत असल्याचे भारती घोष यांनी म्हटले आहे.

या घटनेच्या 10-12 दिवसांनंतर भाजप नेत्या अग्निमित्रा पॉल यांनी त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज पाठवून माफी मागितली. पण त्यांना उत्तर देताना भारती घोष यांनी पुन्हा संताप व्यक्त केला. “दिलीप घोष प्रदेशाध्यक्ष असताना पक्षाच्या सर्व नेत्यांशी संवाद आणि समन्वय अत्यंत कडक होता. पदाधिकाऱ्यांनी मोठ्या शिस्तीने काम केले, परंतु सध्याच्या नेतृत्वाकडून कोणत्याही कार्यक्रमापासून दूर ठेवले जात आहे. त्यामुळेच मला वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनासाठी आम्हाला व्हीव्हीआयपी निमंत्रणे मिळाली नाहीत. इतक्या दिवसांनी मला त्याच्याबद्दल काही ऐकायचे नाही." भारती घोष यांचा मेसेज लीक झाल्यानंतर बंगाल भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात दिलीप घोष यांना विचारले असता त्यांनी यावर उत्तर देणे टाळले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com