Madhya Pradesh Politics : भाजपमधील अंतर्गत कलह वाढणार: शिवराज सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदेंमध्येच रंगणार सामना

BJP Politics : मध्यप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष सज्ज झाले आहेत.
Madhya Pradesh Politics :
Madhya Pradesh Politics : Sarkarnama
Published on
Updated on

Bopal News : मध्यप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष सज्ज झाले आहेत. दुसरीकडे, भाजपचं केंद्रीय नेतृत्वही रणनीती आखण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. गेल्या महिनाभरात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोनदा मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आले होते. दुसरीकडे मुख्यमंत्री पदावरून शिवराज चौहान विरुद्ध ज्योतिरादित्य शिंदे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याने ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडली. मात्र भाजपमध्ये त्यांची गळचेपी होत असल्याने शिंदे यांच्या समर्थक आमदारात नाराजी आहे. पण आधीच अनेक गटांमध्ये विभागलेल्या भाजपमध्ये एक नवीन गट सामील झाल्यानं पक्षांतर्गत स्पर्धा वाढली आहे.

नवा गट ग्वाल्हेरचे 'महाराज' म्हणजेच ज्योतिरादित्य शिंदे यांचा होय. गेल्या एका महिन्यात पाच ज्योतिरादित्य शिंदे समर्थक नेते काँग्रेसमध्ये परतले. त्यात सर्वात मोठ नाव समंदर पटेल यांचं आहे, जे भाजपच्या कार्यकारिणीचे सदस्य होते. त्यामुळे या वादावर भाजप कसा तोडगा काढणार यावर आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीतील भाजपचे यश अपयश अवलंबुन असणार आहे.

Madhya Pradesh Politics :
Police Patil Recruitment News : गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला केले पोलिस पाटील, कॉंग्रेस आक्रमक !

यावेळी मात्र भाजपनेही ज्योतिरादित्य शिंदे यांना स्टार प्रचारक बनवलं आहे. तसेच, केंद्रीय मंत्री होण्यापूर्वी नरेंद्र सिंह तोमर यांनी मध्यप्रदेशातील संघटनेचं नेतृत्व केलं होतं. त्यामुळे निवडणुकीपूर्वी त्यांच्याकडेही राज्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. भाजपचं केंद्रीय नेतृत्वाला सर्व जबाबदारी प्रदेश संघटनेवर टाकण्याची इच्छा नसल्याचे राजकीय विश्लेषकांचं मतं आहे.

ग्वाल्हेरच्या दौऱ्यावर असताना अमित शाह आणि ग्वाल्हेर -चंबळ विभागाच्या जिल्हा अध्यक्षांची बैठकही झाली होती. यावेळी, 'प्रत्येक जागेवर दहा दावेदार आहेत त्यामुळे त्यातल्या एकालाच तिकीट मिळणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर भाजपने ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्याने संघटनेतील कलह चव्हाट्यावर आला आहे. त्यावर, "नवरदेव कसाही असो, त्याच्या चुका काढत बसू नका, फक्त पक्षासाठी काम करा." असा सल्लाही शाहांनी दिला. अमित शाह विधानसभेच्या जागांसाठीच्या उमेदवारांबद्दल बोलले, पण राज्यात पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, हे स्पष्ट न केल्याने यातील सस्पेन्स अधिक वाढला आहे.

Madhya Pradesh Politics :
Ramdas Athawale On Grand Alliance: अजित पवारांचे स्वागत, पण महायुतीत आता नवीन भरती नको, कारण...

ग्वाल्हेर -चंबळमध्ये ज्योतिरादित्य शिंदेंचा दबदबा आहे. काँग्रेसच्या काळापासून या भागात त्यांचं वर्चस्व राहिलं आहे. भाजपमध्ये आल्यानंतर शिंदेंच्या समर्थक आमदारांनाही संघटनेत सहभागी करून घेण्यात आले. त्यातले अनेक जण मंत्री झाले आणि अनेकांना महामंडळं, मंडळांमध्ये महत्त्वाची पदेही देण्यात आली. ग्वाल्हेरच्या प्रदेश कार्यकारीणीच्या बैठकीत बोलताना शिंदे म्हणाले, "ज्या व्यक्तीत जिंकण्याची क्षमता अधिक आहे, त्यालाच भाजपकडून तिकीट मिळेल. भाजप तिकीट वाटपात ना माझा आहे ना तुमचा. शिंदेंच्या या विधानामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये मात्र अस्वस्थता दिसून येत आहे.

भोपाळमध्ये ओळख न सांगण्याच्या अटीवर इच्छुक उमेदवाराने सांगितले की, "आमची फसवणूक झाल्यासारखं वाटते. शिंदे यांच्यासोबत जाता आम्हाला अनेक आश्वासन देण्यात आली. ज्योतिरादित्य शिंदे मुख्यमंत्री होतील. म्हणून आम्ही काँग्रेस सोडून त्यांच्यासोबत भाजपात आलो. आता तिकिट मिळण्यासाठी आम्हीही प्रयत्न करत आहोत, पण आता आम्हाला अशी उत्तरे मिळत आहेत. गेल्या एका महिन्यात पाच ज्योतिरादित्य शिंदे समर्थक नेते काँग्रेसमध्ये परतले आहेत. त्याच्यांतलं सर्वात मोठ नाव समंदर पटेल यांचं आहे.

Madhya Pradesh Politics :
Radhakrishna Vikhe Patil : कर्जत-जामखेडमधील 'त्या' टँकर्सवरून विखे पाटलांचा पाराच चढला; तहसीलदारांना सुनावले !

भाजपसमोर ज्योतिरादित्य शिंदे यांचं नावासाठी काही अडचणीही आहेत. शिंदेंचं नाव दिलं तर जुन्या नेत्यांची नाराजी वाढेल. पण लोकनेता म्हणूनही त्यांचा प्रभाव ग्वाल्हेर आणि चंबळच्या पलीकडे गेला नाही. उर्वरित राज्यामध्येही त्यांची पकड नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीतही ते ओएसडीकडून पराभूत झाले होते. काँग्रेसमध्ये असताना संघटनेत त्याचं वजन होतं. महत्त्वाची पदं होती. पण आता ते एका मंत्रालयाचे मंत्री असल्यानेही कामात अडचणी येत आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com