Nagpur Political News : पोलिस पाटील भरती प्रक्रियेतील अटींकडे दुर्लक्ष करत ग्रामपंचायत सदस्यांची व ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, अशा व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. या प्रक्रियेत प्रचंड घोळ झाला असून चौकशीच्या मागणीसाठी माजी मंत्री तथा सावनेरचे आमदार सुनील केदार यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. (The office bearers of the Congress took out a march on the Collector's office)
याबाबत माहिती देताना महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अवंतिका लेकुरवाळे म्हणाल्या, पोलिस पाटील भरती प्रक्रियेत घोळ झाल्याच्या अनेक तक्रारी आहेत. यात ग्रामपंचायत सदस्यांना नियुक्त करता येणार नसल्याचे जाहिरातीत स्पष्ट होते. तीन उमेदवारांना तर ओळखपत्रच दिले नाही व त्यांना परीक्षेला मुकावे लागले. त्यामुळे अनेक उमेदवारांना स्वत:च्या उत्तरपत्रिका बघायच्या असून त्याची परवानगी देण्यात यावी.
उपविभागीय स्तरावरील या भरतीप्रकरणी चौकशी करावी व नियुक्ती देण्याची तारीख पुढे ढकलावी, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी (Collector) डॉ. विपीन इटनकर यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, समाज कल्याण समिती सभापती मिलींद सुटे, कृषी समिती सभापती प्रवीण जोध, रश्मी बर्वे, राष्ट्रवादीचे सदस्य सलील देशमुख, उज्वला बोढारे, किशोर गजभिये आदी उपस्थित होते.
नागपूर (Nagpur) ग्रामीण तालुक्यातील येरला गावात चक्क गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीची निवड झाली. लोधीपांजरा, पुसागोंदी, बोरी, बोखारा, खापातांडा, धानला, वडगाव आदी ठिकाणी निवड होणारे आधीच निश्चित होते. त्यामुळे लेखी परीक्षेत ज्यांना जास्त गुण आहेत, अशांना प्रत्यक्ष मुलाखतीत कमी गुण देण्यात आले. तर दुसऱ्यांना प्रत्यक्ष मुलाखतीत जास्त गुण देण्यात आले.
एका ठिकाणी तर प्रत्यक्ष मुलाखती एकाला २० पैकी १९ गुण देण्यात आले. यामुळे त्याला सर्वाधिक गुण झाल्याने त्याची निवड दाखवण्यात आली. पोलिस (Police) पाटील नियुक्तीवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आक्षेपावर सुनावणी घ्यावी. यावर निकाल दिल्यावर नियुक्ती द्यावी, असेही लेकुरवाळे म्हणाल्या.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.