Afganistan Internet Ban: अफगाणिस्तानात इंटरनेट सेवा बंद! अनैतिकता थांबवण्यासाठी फतवा काढल्याचं तालिबानकडून जाहीर

Prevention of Internet Services in Afganistan: सध्याचं युग हे इंटरनेटचं युग आहे, अशा काळात तुम्ही इंटरनेटशिवाय कसं जगू शकता? इंटरनेटशिवाय जगण्याची कल्पना तुम्ही करु शकता का?
Internent Ban
Internent Ban
Published on
Updated on

Afganistan Internet Ban: सध्याचं युग हे इंटरनेटचं युग आहे, अशा युगात तुम्ही इंटरनेटशिवाय कसं जगू शकता? इंटरनेटशिवाय जगण्याची कल्पना तुम्ही करु शकता का? करुच शकत नाही. कारण इंटरनेटशिवाय जगण्याचा प्रयत्न तुम्ही कराल पण मग अनेक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागेल. त्यामुळं जगणंच खरंतर अशक्य होऊन जाईल, पण जगात एक देश असा आहे जिथं आता इंटरनेट सेवाच बंद करण्याचा निर्णय तिथल्या सरकारनं घेतला आहे. हा देश म्हणजे अफगाणिस्तान! अफगाणिस्तानातील तालिबान सरकारनं देशात इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Internent Ban
ST Ticket Hike: महापुरानं ग्रामीण जनता त्रस्त त्यात एसटीनंही सोडली माणुसकी! दिवाळीला गावी जाण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे

अनैतिकता थांबवावी

अफगाणिस्तानातील मीडियातील बातम्यांनुसार, तालिबान सरकारनं देशभरात इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इंटरनेटमुळं निर्माण झालेली अनैतिकता संपवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं तालिबान सरकारनं म्हटलं आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानातील सत्ता हस्तगत केल्यानंतर पहिल्यांदाच अफगाणिस्तानात अशा प्रकारे बंदी आणण्याची कुठलीही कारवाई झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला तालिबानी नेता हिबतुल्लाह अखुंदजादा यांनी अनैतिकता थांबवण्यासाठी इंटरनेट सेवांवर प्रतिबंध घालण्याचा आदेश जाहीर केल्यानंतर अनेक प्रांतांमध्ये फायबर ऑप्टिक कनेक्शन बंद झाले आहेत.

Internent Ban
Shiv Sena Politics : पोलिसांना फ्री हॅण्ड', एकनाथ शिंदेंच्या 'दादा'कडून भाजपची कोंडी?

बाहेरच्या जगाशी तुटणार संपर्क

अफगाणिस्तानात इंटरनेट कनेक्टिव्हीटी १४ टक्क्यांपर्यंत घसरली असल्याचं 'नेटब्लॉक्स' या कंपनीनं म्हटलं आहे. देशभरात टेलिकॉम सेवांमध्ये जवळपास संपूर्ण व्यवहार ठप्प झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान नेटब्लॉक्सच्या माहितीनुसार, या बंदीमुळं बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्याचा अफगाणी जनतेच्या क्षमतेवर यामुळं गंभीर परिणाम होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com