Anna Hazare letter To PM Modi: इस्त्रायल-इराण युद्धावरुन अण्णा हजारे चिंतित; मोदींना लिहिले पत्र

Anna Hazare world peace appeal: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सध्याच्या जागतिक तणावाच्या परिस्थितीत भारताने शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली आहे.
Anna Hazare letter to PM Modi
Anna Hazare letter to PM ModiSarkarnama
Published on
Updated on

Ralegan Siddhi (Pune): अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा आठवा दिवस आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. आखाती भागातील संघर्ष तीव्र होत असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी सध्या जगभर वाढत असलेल्या संघर्षाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

मानवतेच्या हितासाठी आणि निरपराध नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारताने शांततेचा मार्ग पुढे नेला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत अण्णा हजारे यांनी हे पत्र पाठवले आहे. सध्या या पत्राची राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

विविध देशांमधील वाढत्या तणावामुळे सामान्य नागरिकांचे जीवन असुरक्षित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः युद्ध आणि संघर्षांमुळे निरपराध महिला, मुले आणि कुटुंबांवर होणारे परिणाम अत्यंत वेदनादायक असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

भारताची संस्कृती ही अहिंसा आणि शांततेवर आधारित आहे. भारताने नेहमीच जगाला संवाद आणि शांततेचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सध्याच्या संवेदनशील काळात भारतासारख्या मोठ्या लोकशाही राष्ट्राकडून मानवतेचा आणि शांततेचा संदेश जगाला जाणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Anna Hazare letter to PM Modi
अजित पवारांचे सुपुत्र खासदार पार्थ पवार हे किती कोटींचे मालक; एकूण संपत्ती किती?

युद्धातून केवळ विनाश घडतो, तर संवादातून समाधान आणि स्थैर्याचा मार्ग निघतो, असेही अण्णा हजारे यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारताने तटस्थ आणि जबाबदार भूमिका घेत जागतिक स्तरावर शांतता आणि संवाद वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी त्यांनी पंतप्रधानांना विनंती केली आहे.

Anna Hazare letter to PM Modi
ACB Raid News: GSTचा मोठा 'मासा' ACBच्या जाळ्यात! राज्यभरातील कार्यालयांमध्ये खळबळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक जागतिक प्रश्नांवर सकारात्मक भूमिका बजावली आहे. त्यामुळे या संवेदनशील काळात भारताने मानवता आणि शांततेच्या बाजूने पुढे येणे हे संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरेल, असेही अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com