Iran US Ceasefire : इराणची एक अट पुन्हा युद्ध पेटवणार? शस्त्रसंधीनंतरही इस्राइलचे 'या' ठिकाणावर हल्ले, ट्रम्प पुन्हा तोंडावर आपटणार?

Israel Lebanon Hezbollah conflict : इराणने अमेरिकेला पाठवलेल्या प्रस्तावात अहिंसेप्रती कटिबद्ध राहणं, होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचंच नियंत्रण कायम राहणार यासह लेबनॉनमधील हिझबुल्लाहविरुद्ध युद्धासह सर्व संघर्षांवर युद्धविरामाची अट इराणने शस्त्रसंधीसाठी अमेरिकेसमोर ठेवली आहे.
Benjamin Netanyahu, Donald Trump, Mojtaba Khamenei
Iran and US ceasefire talks underway as regional tensions escalate, highlighting key Iran ceasefire conditions and global security concerns.Sarkarnama
Published on
Updated on

Lebanon Hezbollah conflict : इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने अमेरिकेसोबत सुरू असलेले युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधीच्या निर्णयाला मान्यता देण्याआधी इराणने अमेरिकेसमोर 10 अटी ठेवल्या आहे.

या अटींवर शुक्रवारी पाकिस्तानमध्ये इराण अमेरिकेसोबत चर्चेला सुरूवात करणार आहे. इराणने पाठवलेल्या या प्रस्तावात अहिंसेप्रती कटिबद्ध राहणं, होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचंच नियंत्रण कायम राहणार यासह लेबनॉनमधील हिझबुल्लाहविरुद्ध युद्धासह सर्व संघर्षांवर युद्धविरामाची अट इराणने शस्त्रसंधीसाठी अमेरिकेसमोर ठेवली आहे.

मात्र, इराणच्या या अटीला इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी असहमती दर्शवली आहे. इराण अमेरिकेतली शस्त्रसंधीच्या प्रस्तावात लेबनॉनमधील हिझबुल्लाचा समावेश नसल्याचं नेतान्याहू यांनी म्हटलं आहे. शिवाय युद्धबंदीनंतरही इस्रायलने लेबनॉनवरील आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत.

लेबनॉनमधील हिझबुल्लाहविरुद्धचे हल्ले थांबवले जाणार नसल्याचं इस्रायलने स्पष्ट केलं आहे. तर दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीमध्ये लेबनॉनचा समावेश नसल्याचंही इस्रायलने म्हटल्यं आहे. त्यामुळे आता यावर इराण काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Benjamin Netanyahu, Donald Trump, Mojtaba Khamenei
Iran Ceasefire Conditions: इराणचा मास्टरस्ट्रोक! युद्ध थांबवलं पण झालेलं सर्व नुकसान भरून काढलं; ट्रम्प यांच्यासमोर शस्त्रसंधीसाठी ठेवलेल्या अटी जाणून थक्क व्हाल

इस्रायलने एकीकडे लॅबनॉनचा शस्त्रसंधीमध्ये समावेश नसल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे एक निवेदन जारी करत ट्रम्प यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. इस्रायलने आपल्या निवेदनात म्हटलंय की, 'इराणने तातडीने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करावी आणि अमेरिका, इस्रायलसह या क्षेत्रातील इतर देशांवरील सर्व हल्ले थांबवावेत, या अटीवर ट्रम्प प्रशासनाने हल्ले स्थगित करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला इस्रायलचा पाठिंबा आहे.'

Benjamin Netanyahu, Donald Trump, Mojtaba Khamenei
RBI policy : युध्द थांबले, पण भारताला भोगावे लागणार परिणाम; रिझर्व्ह बँकेनेच वाढवले मोदी सरकारचे टेन्शन...

तसंच इराणकडून निर्माण होणारा आण्विक आणि क्षेपणास्त्र धोका कायमचा संपवण्यासाठी अमेरिका करत असलेल्या प्रयत्नांनाही इस्रायलने पूर्ण पाठिंबा दिला आहे. मात्र, इराणनेने शस्त्रसंधीसाठी अमेरिकेसमोर ज्या प्रमुख दहा अटी ठेवल्या आहेत. त्यामध्ये लेबनॉनवरील हल्ले थांबवावे अशी एक अट ठेवण्यात आली आहे. या अटीला इस्राइलचा विरोध असल्यामुळे हे युद्ध थांबणार की दोन आठवड्यानंतर पुन्हा या देशांमधील संघर्ष उफाळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com