Iran-America War : चिमुकल्यांचे रक्त, दप्तरं अन् शूज… इराणचा भावनिक स्फोट; अमेरिकेचं शिष्टमंडळही निरुत्तर

minab 168 symbolism school attack : अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये १५ दिवसांची युद्ध बंदी झाली आहे. सध्या युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानच्या मध्यस्थीने चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान पुन्हा एकदा इराणमधील मीनाब येथील शाळेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. येथील शाळेवर झालेल्या हल्ल्यात १६० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.
Iran Israel-America War
Iran Israel-America Warsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. इराणचे शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये अमेरिकेसोबत चर्चेसाठी दाखल झाले असून त्यांनी ‘मिनाब-168’ नावाचे विमान वापरले.

  2. मिनाब शहरातील मुलींच्या शाळेवर झालेल्या हल्ल्याच्या स्मरणार्थ या विमानाला नाव देण्यात आले असून या हल्ल्यात अनेक मुलांचा मृत्यू झाला.

  3. अमेरिकन सैन्याकडून हा हल्ला चुकून झाल्याची शक्यता व्यक्त होत असून चौकशी सुरू आहे; इराणने चर्चेसाठी तयारी दर्शवली पण विश्वास नसल्याचे स्पष्ट केले.

Mumbai News : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध थांबवण्यासाठी सध्या शांती चर्चा सुरू झाली आहे. अमेरिका आणि इराण दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची पाकिस्तानमध्ये चर्चा होणार होणार असून शनिवारी (ता. ११) दोन्ही देशांचे प्रतिनिधी इस्लामाबाद येथे दाखल झाले. पण या वेळी एका कृतीमुळे पुन्हा एकदा इराणमधील मीनाब इथं एका शाळेवर झालेल्या हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. मीनाब येथीस शाळेवरील हल्ल्यात १६० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघर घालिबाफ यांनी ‘X’ वर पोस्ट करत या विद्यार्थ्यांची आठवण केली आहे.

अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धाच्या दरम्यान दिड महिना होत असतानाच १५ दिवसांची युद्ध बंदी झाली. यासाठी पाकिस्तानसह इजिप्तने मध्यस्थी केली. यानंतर आता शांततेसाठी चर्चा सुरू झाली असून आज पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अमेरिकेसोबत शांतता चर्चा होणार आहे. यासाठी इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ दाखल झाले आहे. वाटाघाटी करणाऱ्या टीमचे नेतृत्व इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ करत आहेत. तर उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स हे यांच्या नेतृत्वात अमेरिकेचे शिष्टमंडळ दाखल झाले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील ही महत्त्वपूर्ण बैठक असून या बैठकीत कोणती तोडगा निघतो याकडे जगभराचे लक्ष लागले आहे.

दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा धमकी देवून वाद चिघळेल अशी शक्यता निर्माण केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अल्प कालावधीसाठी सागरी मार्गांवर दबाव आणण्याव्यतिरिक्त इराणकडे दुसरा कोणताही दबावतंत्र नाही. त्यांनी अशीही धमकी दिली की, ते केवळ वाटाघाटी करण्यासाठीच जिवंत आहेत.

Iran Israel-America War
Iran Israel War Update : इराणचा ‘तो’ निर्णय, Fuel-Gas संपणार? India वर काय परिणाम होणार? | America

यावर इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकेर गालिबाफ यांनी देखील प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, त्यांचा देश संवाद आणि वाटाघाटींसाठी तयार आहे. मात्र अमेरिकेने एक प्रामाणिक करार सादर करून इराणच्या हक्कांना मान्यता दिली पाहिजे. इराणची अमेरिकेबद्दल सद्भावना आहे. मात्र विश्वास नाही.

याचवेळी आता गालिबाफ यांनी केलेल्या एका पोस्टची सध्या जगभर चर्चा होत असून त्यांनी 'मिनाब-168'बाबत भाष्य करत एक छायाचित्र पोस्ट केले आहे. 'मिनाब-168' हे इराणचे विमान असून याच विमानाने ते इस्लामाबादमध्ये गेले आहेत. यावेळी त्यांनी, आपल्यासोबत मिनाब येथील ‘शजारेह तय्येबा’ शाळेत ठार झालेल्या काही विद्यार्थ्यांची दप्तरे आणि बूट आणले. या छायाचित्रात ते अमेरिकन क्षेपणास्त्र हल्ल्यात ठार झालेल्या त्या मुलांच्या छायाचित्रांकडे पाहत आहेत.

त्यांनी म्हटले आहे की, शांतता चर्चेसाठी पाकिस्तानात जाणाऱ्या विमानाच्या प्रवासात ही मुले त्यांचे सोबत होती. या निरागस मुलांची छायाचित्रे विमानातील आसनावर ठेवलेली होती. त्यांच्या रक्ताने माखलेल्या बॅग्स, चपला आणि बूटही आणले होते. त्यावर फूलही ठेवलेले होते. इराणने आपल्या कृतीतून अमेरिका आणि इस्रायलला त्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याची आठवण करून दिली असून इराणला दिलेली ही जखम आहे. जी आयुष्यभर विसारता येणार नाही असेही म्हटलं आहे.

इराणमधील मिनाब शहरातील ‘शजारेह तय्येबा’ या मुलींच्या शाळेवर 28 फेब्रुवारी रोजी अमेरिकन सैन्याकडून भ्याड हल्ला करण्यात आला होता. या क्षेपणास्त्र हल्ल्यातील बहुतेक लहान मुली बळी पडल्या होत्या. तर प्राथमिक शाळा उद्ध्वस्त झाली होती. ज्यानंतर याचे फोटो जगभर व्हायरल झाले. तर एकाच वेळी 168 निरागस मुला-मुलींची कबरीचे फोटो व्हायरल झाल्याने जगभर अमेरिकेचा निषेध करण्यात आला होता.

यानंतर अमेरिकेच्या तपास यंत्रणांनी, हा हल्ला अमेरिकन सैन्याकडून चुकून झाला असावा असे सांगत या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी म्हटले होते. यानंतर आता पुन्हा एकदा इराणने या हल्ल्याच्या आठवणी ताज्या करत अमेरिका-इस्रायलला आरसा दाखवण्याचे काम केलं आहे.

Iran Israel-America War
USA-Iran War : इराण-अमेरिका युद्ध पाकिस्तान थांबवणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शरीफ यांची पोस्ट शेअर

FAQs :

1. ‘मिनाब-168’ विमानाचे महत्त्व काय आहे?
हे नाव मिनाब शहरातील शाळेवर झालेल्या हल्ल्याच्या स्मरणार्थ देण्यात आले आहे.

2. मिनाब हल्ल्यात काय घडले होते?
क्षेपणास्त्र हल्ल्यात एक प्राथमिक शाळा उद्ध्वस्त झाली आणि अनेक मुलांचा मृत्यू झाला.

3. हा हल्ला कोणी केला असा संशय आहे?
अमेरिकन सैन्याकडून चुकून हा हल्ला झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

4. इराणची अमेरिकेबाबत भूमिका काय आहे?
इराण चर्चेस तयार आहे, पण अमेरिकेवर पूर्ण विश्वास नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

5. इस्लामाबादमध्ये काय सुरू आहे?
इराण आणि अमेरिका यांच्यातील महत्त्वाच्या राजनैतिक चर्चांना सुरुवात झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com