USA-Iran War : इराण-अमेरिका युद्ध पाकिस्तान थांबवणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शरीफ यांची पोस्ट शेअर

Pakistan USA-Iran War : इराण-अमेरिकामध्ये चर्चेसाठी पाकिस्तान निर्णायक भूमिका निभावण्याची शक्यता आहे.
Shehbaz Sharif’
Shehbaz Sharif’Sarkarnama
Published on
Updated on

USA-Iran War News : अमेरिका-इराण युद्धाच्या झळा जगभर जाणवत आहे. या युद्धामुळे जगावर ऊर्जा संकट कोसळले आहे. हे युद्धा कधी थांबणार याची चर्चा सुरू असताना ब्रिटीनमधील 'द फायनान्शियल टाइम्स' वृत्तपत्राने पाकिस्तान या युद्धात मध्यस्थी करत असल्याचे वृत्त दिले आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांची सोशल मीडियावरील पोस्ट शेअर करत तसे संकेत दिले आहेत.

शाहबाज शरीफ यांनी ट्विटवर अमेरिका आणि इराणच्या सहमतीने सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी अर्थपूर्ण आणि निर्णायक चर्चेचे यजमानपद भूषवण्यास पाकिस्तान तयार असल्याचे म्हटले आहे.

शाहबाज शरीफ यांच्या या पोस्टचा स्क्रिनशाॅट TRUTH या सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे अमेरिका चर्चेसाठी तयार असल्याची चर्चा आहे.

इराणने अमेरिकेसोबत चर्चा करण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. तसेच मागच्या दाराने अमेरिकेची इराणसोबत चर्चा सुरू असल्याच्या ट्रम्प यांच्या दाव्याची खिल्ली उठवली आहे. तसेच अमेरिकेकडून चर्चेसाठी विनंती करण्यात आली आहे, असे काही मित्र राष्ट्रांकडून इराणला संदेश देण्यात आला असल्याचे इराणी सरकारी माध्यमांनी सांगितले आहे.

Shehbaz Sharif’
US Iran war : संपूर्ण जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट! अमेरिका-इराण संघर्ष किती काळ चालणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं, "जोपर्यंत..."

याच आठवड्यात चर्चा

अमेरिकेतील Axios या मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार युद्धा समाप्तीसाठी याच आठवड्यात पाकिस्तानमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ट्रम्प यांचे विश्वासू सहकारी स्टीव्ह विटकॉफ आणि जावई जारेड कुशनर हे इराणी शिष्टमंडळाला भेटू शकतात. या वाटाघाटींचे केंद्र पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद असू शकते.

Shehbaz Sharif’
US Attack on Iran Ships : तेलमार्गावरच युद्ध पेटलं! होर्मुझमध्ये सुरुंग पेरणारी इराणची 16 जहाजे उडवली, अमेरिकन सैन्याने कारवाईचा थरारक VIDEO केला शेअर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com