Rahul Gandhi : PM मेलोनी राहुल गांधींना कोर्टात खेचू शकतात का? काय आहे कायद्यात तरतूद?

Giorgia Meloni Rahul Gandhi defamation case : PM जॉर्जिया मेलोनी राहुल गांधींविरोधात कोर्टात जाऊ शकतात का? मानहानी, कायदेशीर कारवाई आणि भारतीय कायद्यातील तरतुदी काय सांगतात जाणून घ्या.
Rahul Gandhi : PM मेलोनी राहुल गांधींना कोर्टात खेचू शकतात का? काय आहे कायद्यात तरतूद?
Published on
Updated on

काँग्रेसच्या कंस्ट्रक्टिव कांग्रेस कन्वेंशन या कार्यक्रमात राहुल गांधी आणि काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांच्यातील संवादामुळे भारताची परराष्ट्र धोरण आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. परदेशात गेल्यावर तिथल्या राष्ट्रप्रमुखांची गळाभेट घेणे म्हणजे परराष्ट्र धोरण नव्हे, असा टोला गांधी यांनी मोदींना लगावला आहे.

राहुल गांधींनी विदेश धोरणाची तुलना गळाभेटीशी करण्याच्या कल्पनेवर मिश्कील टिप्पणी केली. त्यावर संदीप दीक्षित यांनी राहुल गांधींनी त्यांना गळाभेट देताना जॉर्जिया मेलोनी समजले होते का, असा विनोदी सवालही यावेळी केला.

Rahul Gandhi : PM मेलोनी राहुल गांधींना कोर्टात खेचू शकतात का? काय आहे कायद्यात तरतूद?
Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावरकर टिप्पणी प्रकरण पोहोचले सुप्रीम कोर्टात; राहुल गांधींना मोठा दिलासा

या चर्चेदरम्यान संदीप दीक्षित राहुल गांधींना म्हणाले, "एक गोष्ट विचारू का?, मेलोनी समजून तर पकडलं नाही ना? संदीप दीक्षित यांचा हा टोला इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेकदा झालेल्या भेटींवर होता. यावर राहुल गांधी हसत म्हणाले, "नाही-नाही, मी अजून तिथपर्यंत पोहोचलो नाही." याच पार्श्वभूमीवर आता एक महत्त्वाचा कायदेशीर प्रश्न उपस्थित झाला आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी भारतातील एखाद्या राजकीय नेत्याविरोधात कायदेशीर कारवाई करू शकतात का?

भारतीय कायद्यानुसार परदेशी नागरिकांना योग्य परिस्थितीत भारतीय न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यास पूर्णपणे मनाई नाही. एखाद्या परदेशी पंतप्रधानांचा दावा कोणत्या स्वरूपाचा आहे, ते ते वैयक्तिक नात्याने दाखल करत आहेत की आपल्या देशाच्या प्रतिनिधी म्हणून, यावर कायदेशीर प्रक्रिया अवलंबून राहते.

Civil Procedure Code, 1908 मध्ये परदेशी राज्ये आणि शासकांशी संबंधित विशेष तरतुदी आहेत. विशेषतः Section 84 अंतर्गत काही परिस्थितींमध्ये परदेशी राज्याला भारतीय न्यायालयात दिवाणी दावा दाखल करण्याची परवानगी मिळू शकते. मात्र त्यासाठी भारतीय कायद्यातील आवश्यक अटी पूर्ण करणे गरजेचे आहे.

मानहानीच्या प्रकरणात परिस्थिती आणखी वेगळी असू शकते. एखाद्या परदेशी नेत्याबद्दल खोटे आणि मानहानीकारक वक्तव्य करण्यात आले असल्याचा दावा असल्यास, संबंधित व्यक्ती भारतीय कायद्यानुसार उपलब्ध कायदेशीर उपायांचा विचार करू शकते. मात्र केवळ एखाद्या परदेशी नेत्यावर टीका केली म्हणून तो आपोआप मानहानीचा गुन्हा ठरत नाही.

Rahul Gandhi : PM मेलोनी राहुल गांधींना कोर्टात खेचू शकतात का? काय आहे कायद्यात तरतूद?
Top 10 News : भाजपमधील बड्या नेत्याची काँग्रेसमध्ये घरवापसी? CM फडणवीसांच्या रॅलीसाठी शालेय विद्यार्थ्यांना धरलं वेठीस, एकनाथ शिंदेंचा घात?

न्यायालयात वक्तव्य नेमके काय होते, ते तथ्यहीन किंवा खोटे होते का? कोणत्या संदर्भात केले गेले आणि त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या मानहानी झाली का, यासह अनेक बाबी तपासून यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे जॉर्जिया मेलोनी राहुल गांधींविरोधात थेट कोर्टात जाऊ शकतात का, याचे उत्तर परिस्थितीवर अवलंबून आहे. परदेशी पंतप्रधान असल्यामुळे भारतीय न्यायालयात जाण्याचा मार्ग आपोआप बंद होत नाही; मात्र दावा दाखल करण्यासाठी भारतीय कायद्यातील अधिकारक्षेत्र, प्रक्रिया आणि आवश्यक कायदेशीर अटी पूर्ण कराव्या लागतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com