Giorgia Meloni : आठवतंय का जॉर्जिया मेलोनी अन् मोदींचे व्हायरल्स 'रिल्स'? म्हणतात, 'मोदी, ट्रम्प आणि माझ्यावर चिखलफेक...'

Italy PM Giorgia Meloni PM Narendra Modi US President Donald Trump : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी जगभरातील डाव्या नेत्यांना ढोंगी म्हटले आहे.
Giorgia Meloni
Giorgia MeloniSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी जगभरातील डाव्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. डावे नेते ढोंगी आहेत, असे म्हणताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक केले आहे.

'मोदी (Narendra Modi), ट्रम्प अशी उजवे नेते जगात उदयास आल्याने डावे नेते अस्वस्थ आहे. यातून ते आमच्यांवर चिखलफेक करतात', असा टोला देखील जॉर्जिया यांनी लगावला आहे.

जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या, "लोक आम्हाला निवडतात, कारण आम्ही स्वातंत्र्याचे रक्षण करतो. आम्ही पहिला राष्ट्राचा अभिमान बाळगतो, देशाच्या सीमा सुरक्षित ठेवतो. कुटुंबसंस्थेच्या मूल्यांसाठी लढतो, आम्ही सामान्य माणसाच्या सामान्य बुद्धीचा आदर करतो".

Giorgia Meloni
Rashmi Thackeray On Neelam Gorhe : नीलम गोऱ्हेंच्या 'मर्सिडीज' विधानावर ठाकरेंच्या वाघिणी अडचणी वाढवणार; 'मातोश्री'वर रश्मी ठाकरेंच्या उपस्थित खलबत

'90च्या दशकात बिल क्लिंटन आणि टोनी ब्लेअर यांनी जागतिक स्तरावर डाव्यांचे नेटवर्क तयार केले होते. तेव्हा त्यांना महान नेते म्हटले गेले. कौतुक होत होते. पण आज डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump), अर्जेंटीना राष्ट्रपती जेवियर मिलेई आणि अगदी नरेंद्र मोदी बोलतात तेव्हा, लोकशाहीला धोका असल्याचे म्हटले जाते. हा डाव्यांचा दुटप्पीपणा आहे', असा घणाघात जॉर्जिया मेलोनी यांनी केला.

Giorgia Meloni
Anant Bhave Passes Away: ज्येष्ठ साहित्यिक, वृत्तनिवेदक अनंत भावे यांचे निधन

'उजव्या विचारसरणीचे नेते ट्रम्प परत आल्यापासून डाव्या विचारांचे नेते वैतागले असून, ते आता घाबरले आहेत. यातून ते आमच्यावर चिखलफेक करतात. पण त्यांच्यावर लोकांचाही विश्वास राहिलेला नाही. त्यांनी आमच्यावर कितीही चिखलफेक केली, तरी लोक आम्हालाच मतदान करणार', असा विश्वास जॉर्जिया मेलोनी यांनी व्यक्त केला.

मोदींची त्यावेळेची प्रतिक्रिया

जॉर्जिया मेलोनी आणि नरेंद्र मोदी यांचे समाज माध्यमांवर मोठ्याप्रमाणात रिल्स व्हायरल झाले आहेत. एकप्रकारे दोघा दिग्गजांना ट्रोल करण्यात आले होते. याच दरम्यान, भारतातील परिषदेनंतर जून 2024 मध्ये नरेंद्र मोदी इटलीमध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेत सहभागी झाले होते. त्यावेळी जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांचे स्वागत केले होते. जॉर्जिया मेलोनी यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत हसतानाचा व्हिडिओ होता. या व्हिडिओवर समाज माध्यमांवर चांगल्याच प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यावर मोदी यांनी 'भारत-इटली मैत्री चिरंजीव राहो', अशी प्रतिक्रिया दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com