Rashmi Thackeray On Neelam Gorhe : नीलम गोऱ्हेंच्या 'मर्सिडीज' विधानावर ठाकरेंच्या वाघिणी अडचणी वाढवणार; 'मातोश्री'वर रश्मी ठाकरेंच्या उपस्थित खलबत

Uddhav Thackeray ShivSena Rashmi Thackeray Mumbai Matoshree Legislative Council Deputy Speaker Neelam Gorhe : विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पद वाटपावर केलेल्या विधानावरून वाद.
Rashmi Thackeray
Rashmi Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या तथा विधान परिषदे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की, पद मिळायचे, असा आरोपाने खळबळ उडाली आहे.

नीलम गोऱ्हे यांच्या या आरोपावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षातील वाघिणी चांगल्या आक्रमक झाल्या आहेत. रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई 'मातोश्री' इथं महिला पदाधिकार्‍यांची बैठक होणार असून, गोऱ्हेंना घेरण्यासाठी रणनीती आखली जाणार आहे. यातून दोन्ही शिवसेनांमध्ये संघर्ष उभारण्याची शक्यता आहे.

दिल्लीत 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमातील मुलाखतीत नीलम गोऱ्हे यांनी हा आरोप केला. नीलम गोऱ्हे यांच्या या आरोपाने शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने जोरदार पलटवार केला. परंतु, या आरोपांना ठाकरेंची शिवसेना चांगली दुखावली आहे. या आरोपांविरोधात अधिक आक्रमक होण्याची तयारी ठाकरेंच्या शिवसेनेने सुरू केली आहे.

Rashmi Thackeray
Madhi Kanifnath Yatra : मुस्लिम व्यापारी परंपरा मोडतात, यात्रेत नकोच; मढी ग्रामपंचायतीच्या ठरावाविरोधात 'वंचित' आक्रमक

रश्मी ठाकरे स्वतः या आरोपांविरोधात मैदानात उतरणार आहे. तशी आज मुंबई 'मातोश्री' निवासस्थानी मुंबई (Mumbai) परिसर आणि पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन करण्याची तयारी असल्याचे सांगितले जाते आहे.

Rashmi Thackeray
Top Ten News : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये उद्या मोठ्या घडामोडींचे संकेत; गोऱ्हेंविरोधात आता 'तात्या' मैदानात! - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

नीलम गोऱ्हे नेमक्या काय म्हणाल्या

"ठाकरे यांच्या शिवसेनेत पद मिळवायचे असेल, तर दोन 'मर्सिडीज' गाड्या दिली की, पद मिळते, ही वस्तुस्थिती आहे. हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते, तोपर्यंत त्यांचे सगळीकडे लक्ष होते. उद्धव मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हाला आनंद वाटला. बाळासाहेबांच्या मुलाला ते पद मिळाले, त्याचा आनंद होता. पण नंतर आमदारांना भेटी मिळायच्या नाहीत. मी मर्सिडिज दिल्या नाहीत. माझ्यासारख्या काही जणांवर ही वेळ आली नाही. पण अनेकांना द्यावी लागली, ही वस्तुस्थिती आहे", असा खळबळजनक आरोप नीमल गोऱ्हे यांनी केला.

उद्धव ठाकरे संतापले

'नीमल गोऱ्हे यांच्या या आरोपावरून उद्धव ठाकरे चांगलेच संतापले. हे गये-गुजरे लोक आहे. त्यांना शिवसेनेने पद दिली. राजकारणात त्यांनी त्यांचे चांगभले करून घेतले. स्वत: मर्सिडीजमधून फिरत असताना, लाडक्या बहिणी उपाशी आहेत, त्याचे काय?', असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. 'शिवसेनेने त्यांना अनेक पद दिलीत. त्यानुसार त्यांनी आठ मर्सिडीत दिल्या असतील? त्याच्या पावत्या त्यांनी द्याव्यात', असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com