
Vice President Jagdeep Dhankhar News : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे सादर केला आहे.
त्यांनी आपल्या राजीनाम्यात आरोग्यासंदर्भातील कारणांचा उल्लेख केला असला तरी त्यांच्या राजीनाम्यामुळे विरोधी पक्षांतील लोकांनी हे कारण न पटणारं असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस नेते आणि मुख्य प्रतोद जयराम रमेश यांनी दावा केला की, धनखड यांच्यासोबत ते संध्याकाळी 7:30 वाजता फोनवर बोलले होते.
त्यावेळी ते त्यांच्या कुटुंबियांसोबत होते आणि त्यांनी सांगितले की ते उद्या त्यांच्याशी बोलतील. शिवायत्याआधी संध्याकाळी पाच वाजता ते प्रमोद तिवारी आणि अखिलेश प्रसाद सिंह यांनी धनखड यांची भेट घेतली होती.
शिवाय मंगळवारी सकाळी 10 वाजता व्यवसाय सल्लागार समितीची बैठक होईल असंही धनकड यांनी सांगितले होतं. त्यामुळे सर्वकाही सामान्य असताना त्यांनी अचानक राजीनामा का दिला? असा प्रश्न काँग्रेससह विरोधकांकडून उपस्थित केली जात आहेत.
तर दुसरीकडे धनखड यांच्या राजीनाम्यापूर्वी, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात बरीच हालचाल सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या एका खासदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, त्यांच्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या जात होत्या.
संध्याकाळी संसदेतील राजनाथ सिंह यांच्या कार्यालयाबाहेर खूप गर्दी जमली होती. यावेळी तिथे काही बैठका देखील घेण्यात आल्या. तर यावेळी अनेक भाजप खासदार राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात घुसले आणि काहीही न बोलता बाहेर पडले, असंही सुत्रांनी सांगितलं.
दरम्यान, जयराम रमेश यांनी एक्सवर एक पोस्ट करत राजीनाम्यावर शंका उपस्थित केली आहे. त्यांनी लिहिलं की, काल दुपारी 12:30 वाजता जगदीप धनखड यांनी राज्यसभेच्या व्यवसाय सल्लागार समिती (BAC) चे अध्यक्षपद भूषवलं. यावेळी सभागृह नेते जे.पी नड्डा आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते. थोड्या चर्चेनंतर पुढील बैठक पुन्हा 4:30 वाजता घेण्याचा निर्णय घेतला.
4:30 वाजता समितीचे सदस्य धनखड यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीसाठी पुन्हा जमले आणि नड्डा आणि रिजिजू यांची वाट पाहत होते. मात्र ते दोघेही या बैठकीला आले नाहीत. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे धनखड यांनाही ते येणार नसल्याची कल्पना देण्यात आली नव्हती.
साहजिकच, त्यांना याचं फार वाईट वाटलं आणि त्यांनी बीएसीची पुढील बैठक आज दुपारी एक पर्यंत पुढे ढकलली. मात्र, काल दुपारी 1 ते 4.30 च्या दरम्यान काहीतरी मोठी घडामोड घडल्याचं स्पष्ट आहे. ज्यामुळे जेपी नड्डा आणि किरण रिजिजू हे जाणूनबुजून संध्याकाळच्या बैठकीला गैरहजर राहिले.
त्यानंतर धनखड यांनी धक्कादायक पाऊल उचललं आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी त्यांच्या प्रकृतीचे कारण दिलं आहे. अर्थात आपण याचा आदर केला पाहिजे. पण सत्य हे आहे की यामागे काही आणखी काही कारणे आहेत? धनखड यांचा राजीनामा त्यांच्याबद्दल बरेच काही सांगून जातो. तसेच त्यांना उपराष्ट्रपतीपदी बसवणाऱ्यांच्या हेतूंबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करतो, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.