Congress on Modi Government : लोकशाहीवर खतरनाक हल्ले, देशात 11 वर्षे अघोषित आणीबाणी!

Jairam Ramesh’s Allegations Against Modi Government : भारतीय जनता पक्षाचे हल्ले परतवून लावताना काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत.
Congress leader Jairam Ramesh accusing the Modi government of imposing an undeclared emergency and threatening India’s democratic structure.
Congress leader Jairam Ramesh accusing the Modi government of imposing an undeclared emergency and threatening India’s democratic structure. Sarkarnama
Published on
Updated on

Undeclared Emergency : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तत्कालीन काँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारताच्या लोकशाही इतिहासातील हा काळा अध्याय असल्याचे मोदींनी म्हटले आहे. त्यावर काँग्रेसनेही जोरदार पलटवार करत देशात मागील 11 वर्षे अघोषित आणीबाणी असल्याचा हल्लाबोल केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे हल्ले परतवून लावताना काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, मागील 11 वर्षे देशात अघोषित आणीबाणी असून लोकशाहीवर वेगवेगळ्या दिशांनी संघटित आणि खतरनाक हल्ले केले जात आहेत. राजकीय विरोधकांविरोधात तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे.

संसदीय परंपरा मोडित काढल्या जात असून न्यायपालिका कमजोर केली जात आहे. आता निवडणूक आयोगाची निष्पक्षता आणि विश्वसनीयतेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले असल्याचा दावा जयराम रमेश यांनी केला आहे. संविधानावर हल्ले होत आहेत. संविधान बदलण्यासाठी पंतप्रधानांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारश्याला धक्का देण्यासाठी चारशे पारचा नारा दिला होता. पण जनतेने त्यांना नाकारले होते, असेही रमेश यांनी म्हटले आहे.

Congress leader Jairam Ramesh accusing the Modi government of imposing an undeclared emergency and threatening India’s democratic structure.
Top Ten News : 'माळेगाव'मध्ये अजितदादांची सरशी, लाड यांचा 'पेन ड्राईव्ह बाॅम्ब', भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला पोलिसाचा विनयभंग; वाचा महत्वाच्या घडामोडी...

काँग्रेसचे महासचिव असलेले जयराम रमेश यांनी पुढे म्हटले आहे की, मोदी सरकारने सातत्याने संसदीय पंरपरा आणि मर्यादा मोडित काढल्या आणि जनतेशी संबंधित मुद्दे मांडणाऱ्या खासदारांना मनमानी पध्दतीने निलंबित करण्यात आले. सरकारने राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाच्या गंभीर मुद्द्यांवर चर्चेसाठी नकार दिला आहे. महत्वाची विधेयके चर्चेविना पारित करण्यात आली. संसदीय समित्यांच्या भूमिका अमान्य करण्यात आल्या, असे आरोपही रमेश यांनी केले आहेत.

काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पारदर्शकतेवरही रमेश यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणुकांच्या तारखा आणि टप्पे अशा पध्दतीने निश्चित करण्यात आले, ज्यामुळे सत्ताधारी पक्षाला फायदा होईल. पंतप्रधान आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भडकाऊ आणि विभाजनकारी भाषणांवर आयोगाने चुप्पी साधली. सरकारने केंद्र आणि राज्यांच्या संबंधांमध्येही दरी निर्माण केल्याचा आरोप रमेश यांनी केला.

Congress leader Jairam Ramesh accusing the Modi government of imposing an undeclared emergency and threatening India’s democratic structure.
Election Commission vs Rahul Gandhi : तुम्हीच तारीख अन् वेळ सांगा..! निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आधी चॅलेंज, आता पुरावेच दिले...

विरोधी पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारे पाडण्यासाठी पैशांचा वापर करण्यात आला. या राज्यांमधील विधेयके रोखण्यासाठी विद्यापीठांमधील नियुक्त्यांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी राज्यपाल कार्यालयाचा दुरूपयोग करण्यात आला. टॅक्स टेररिझम आणि यंत्रणांच्या माध्यमातून भीतीचे वातावरण तयार करण्यात आल्याने आधी बिनधास्त बोलणारे उद्योगपती आता गप्प असल्याचा दावाही रमेश यांनी केला.

तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून एका आवडत्या कॉर्पोरेट समूहाला फायदा करून दिला. विमानतळ, बंदरे, सिमेंट उद्योगासह मीडिया हाऊसही त्या समूहाला सोपविण्यात आले. सरकारवर टीका करणाऱ्यांना सातत्याने बदनाम करण्यात आले. सत्तेत बसलेल्या लोकांना सातत्याने कट्टरता पसरवली. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटले गेले. जातनिहाय जनगणनेची मागणी करणाऱ्यांना अर्बन नक्षल म्हटले गेले. अल्पसंख्यांक समुहातील लोक भीतीखाली जगत आहे. दलित आणि अन्य समुहातील लोकांना लक्ष्य केले जात आहे, अशी टीका जयराम रमेश यांनी केली आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com