Lok Sabha Seession : संसदेचे अधिवेशन संपून 10 दिवस झाले, पण अजून..! काँग्रेस नेत्यांना सतावू लागली भीती, कारस्थान...

Jairam Ramesh, Lok Sabha adjournment, Delimitation Bill, Amit Shah : विशेष अधिवेशनातून मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमत जुळवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा काँग्रेसकडून थेट सवाल.
Parliament News
Parliament NewsSarkarnama
Published on
Updated on

Parliament Session update : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे १३ ऑगस्टलाच सूप वाजले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गदारोळातच हे अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. मात्र, या घटनेला दहा दिवस उलटून गेले तरी अद्याप राष्ट्रपतींकडून त्याला औपचारिक मंजुरी दिलेली नसल्याचा दावा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. यामध्ये काही षडयंत्र आहे का, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

जयराम रमेश यांनी सोशल मीडियात एक पोस्ट करत याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब केल्यानंतर त्याचे सत्रावसान होण्यासाठी साधारणपणे दोन ते चार दिवसांचा कालावधी असतो. अधिवेशन स्थगित केल्यानंतर अनेकदा त्याचदिवळी सत्रावसानही झाले आहे.'

अधिवेशन तहकूब झाल्यानंतर त्याला राष्ट्रपतींकडून मंजूरी देण्याच्या प्रक्रियेला सत्रावसान म्हणतात. म्हणजे पावसाळी अधिवेशनाचा कालावधी संपला यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब होते. मात्र, अद्याप असा आदेश आला नसल्याचा दावा जयराम रमेश यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यांनुसार, या लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब होऊन दहा दिवस उलटले आहेत, तरीही अद्याप सत्रावसानाबाबत माहिती नाही.

Parliament News
Congress MP news : खासदार सासऱ्याने तिकीट न देण्याचे जाहीर करताच जावयाचा काँग्रेसला रामराम; मतदारसंघच हातून जाण्याची भीती

अधिवेशन तहकूब झाल्यानंतर सत्रावसानासाठी यापूर्वी २०१५ मध्ये २८ दिवस आणि २०२१ मध्ये २० दिवसांचा कालावधी लागला होता. पण त्यावेळी सरकारकचे कोणतेही कारस्थान सुरू नव्हते. मग मग यावेळी सत्रावसानासाठी एवढा विलंब का, असा सवाल जयराम रमेश यांनी केला आहे.

Parliament News
तब्बल अर्धा कोटी फॉलोअर्स, पण तुकाराम मुंढे सोशल मीडियात एकाच नेत्याला करतात फॉलो...

नेमकी भीती काय?

जयराम रमेश यांनी सरकारकडून विशेष अधिवेशन बोलावले जाऊ शकते, असे सूचक संकेत दिले आहेत. या अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडले जाईल, अशी शंका त्यांना आहे. याबाबत त्यांनी म्हटले आहे की, मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयक विशेष अधिवेशनात मंजूर करून घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत जुळविण्याच्या प्रयत्नात आहेत का?, असा थेट सवाल काँग्रेसने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com