

Congress Politics : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशातील सहारनपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार इमरान मसूद यांना जोरदार झटका बसला आहे. त्यांचे जावई शायान मसूद यांनी पक्षाला रामराम ठोकत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर आता कुटुंबातील कलहही चव्हाट्यावर आला आहे. तसेच मसूद यांच्या मतदारसंघातील वर्चस्वालाही धक्का बसल्याचे मानले जात आहे.
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. उमेदवारीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. अनेक मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदारांची भूमिका निर्णायक आहे. इमरान मसूद हे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नेते मानले जातात. सहारनपूर मतदारसंघासह अन्य मुस्लिमबहुल भागात त्यांचा वरचष्मा आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत एकाही नातेवाईकाला उमेदवारी देणार नाही, अशी घोषणा मसूद यांनी नुकतीच केली आहे. त्यानंतरच त्यांचे जावाई शायान यांनी काँग्रेसमधून तडकाफडकी अखिलेश यादव यांची भेट घेत समाजवादी पक्षात प्रवेश केला. शायान यांच्यासोबत त्यांचे वडील शाजान समूद यांनीही सायकल हाती घेतली आहे.
शायान मसूद हे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत काजी रशीद मसूद यांचे नातू आहेत. तर इमरान मसूद हे काजी यांचे भाचे आहेत. त्यामुळे सहारनपूर मतदारसंघात काजी आणि मसूद कुटुंबाचे वर्चस्व मानले जाते. मात्र, राजकीय महत्वाकांक्षेपायी कुटुंबात कलह सुरू झाला आहे. याचा थेट फटका मसूद यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इमरान मसूद यांच्यासोबत आपले वैचारिक मतभेद असल्याचे शायान यांनी म्हटले आहे. भविष्यात समाजवादी पक्षाकडून शायान यांना उमेदवारी दिली जाणार का, हेही पाहणे महत्वाचे असेल.
दरम्यान, शायान यांनी समाजवादी पक्षात प्रवेश करताच इमरान मसूद यांच्या पुतण्याने शायान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शायान यांनी आपल्या बहिणीला मारहाण केली, घरातून बाहेर काढल्याचा आरोप केला आहे. त्याला शायान यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. ही कौटुंबिक बाब असून केवळ कौटुंबिक पातळीवरच उत्तर देईन, असे ते म्हणाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.