Jalna Maratha Protest : जालना लाठीचाराचे नाशिकमध्ये पडसाद; 'गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या', आंदोलकांची मागणी !

Devendra Fadnavis resign Demand : "पोलिसांनी बळाचा वापर करून लाठीचार्ज आणि हवेत गोळीबार केला."
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

NashiK News : "जालना येथील मराठा समाजाच्या शांततापूर्ण आंदोलनात महिला, मुलांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. हे राज्य सरकारी यंत्रणेचे भेसूर रूप आहे. त्यामुळे दुटप्पी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा समाजाच्या तरूणांनी आंदोलकांनी केली आहे. (Latest Marathi News)

अंतरवेली (जालना) येथे मराठा (Maratha) समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस (Police) लाठीमाराच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. या लाठीमाराच्या निषेधार्थ नवी बेज (कळवण) (Nashik) येथील ग्रामस्थांनी निषेध (Agitation) करीत आंदोलन केले.

Devendra Fadnavis
Rohit Pawar On NCP Crisis : राष्ट्रवादीत वाढतेय रोहित पवारांची 'पॉवर'; विरोधी नेत्यांसोबत भेटीगाठी, सुळेंनी केले 'राष्ट्रीय प्रमोशन' ?

जालना जिल्ह्यात अंतरवेली येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शांततामय धरणे आंदोलन सुरू होते, असे असताना पोलिसांनी बळाचा वापर करून लाठीचार्ज आणि हवेत गोळीबार केला. लहान मुलं, महिलांवर लाठीमार करीत मराठा समाजाचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. त्याची तीव्र प्रतिक्रिया सत्ताधारी गटात दाखल झालेल्या अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार यांचा मतदारसंघ असलेल्या नवीबेज (ता. कळवण) येथे उमटली.

येथील ग्रामस्थांच्या वतीने या लाठीमार व राज्य सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा व जालना जिल्ह्याच्या एसपींना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली. मराठा समाजाच्या भावना समजून घेऊन समाजाच्या आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देखील देण्यात आला.

Devendra Fadnavis
Sushma Andhare On BJP : उद्धव ठाकरे पंतप्रधान होत असतील तर भाजपनेही पाठिंबा द्यावा; अंधारेंनी सांगितले कारण

याप्रसंगी माजी उपसरपंच पोपट पवार, माजी उपसरपंच नरेंद्र वाघ, शालेय शिक्षण कमिटीचे अध्यक्ष पंकज पवार, ज्येष्ठ नागरिक साहेबराव पवार, बाळासाहेब खैरनार, योगेश खैरनार, हिंदुस्तानी क्लबचे अध्यक्ष शरद निकम, शशिकांत पवार, सनी वालिंकार, केदा जगताप, अतुल पवार, संभाजी सोसायटीचे चेअरमन दीपक खैरनार आदि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com