Sushma Andhare On BJP : उद्धव ठाकरे पंतप्रधान होत असतील तर भाजपनेही पाठिंबा द्यावा; अंधारेंनी सांगितले कारण

Uddhav Thackeray Vs BJP : विरोधकांवर दडपण आणण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : ‘एक देश, एक निवडणूक’ या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन या महिन्याच्या १८ ते २२ तारखेपर्यंत बोलावण्यात आले आहे. या संकल्पनेवर शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या आणि धडाडती तोफ सुषमा अंधारे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी हल्लाबोल केला. तसेच मराठी चेहरा पंतप्रधान होत असतील तर भाजपनेही उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा, असे म्हणत अंधारेंनी कारणही स्पष्ट केले. त्या उद्धश्री पुरस्कार २०२३ च्या वितरण सोहळ्यानंतर पिंपरीत बोलत होत्या. (Latest Political News)

संसदेचे हे विशेष अधिवेशन म्हणजे विरोधकांवर दडपण आणण्याचा प्रयत्न असून तो सत्तेचा दुरुपयोग असल्याची टीका सुषमा अंधारेंनी केली. "भाजप आणि टीम मोदींनी पराभव दिसू लागल्याने त्यातूनही दडपशाही सुरु झाली आहे. `डू ऑर डाय`च्या स्थितीत सध्या केंद्र सरकार असल्याने कुठल्याही परिस्थितीत सत्ता राखण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे. जनता मात्र त्यांच्या हा प्रयत्न हाणून पाडेन", असा विश्वासही अंधारेंनी यावेळी व्यक्त केला.

Sushma Andhare
Sharad Pawar Speech : 'ते आले तर ठीक, अन्यथा दूर लोटण्यासाठी सर्वकाही करू' ; शरद पवारांचा रोख कुणाकडे ?

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव पंतप्रधान पदासाठी घेतले जात आहे. त्यावर "त्यांचे नाव या पदाच्या रेसमध्ये येणार की नाही, हे इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर ठरेल", असे सावध उत्तर अंधारे यांनी दिले. तसेच उद्धव ठाकरेंचे नाव पंतप्रधान पदासाठी नाव पुढे आले तर आनंदच होईल", असेही त्या म्हणाल्या.

Sushma Andhare
Prakash Ambedkar News : '' आम्ही 'इंडिया' आघाडीत येण्यास इच्छुक, पण...'' ; 'वंचित'च्या प्रकाश आंबेडकरांनी 'ही' अट ठेवली समोर

"राष्ट्रपती पदासाठी प्रतिभा पाटील यांचे नाव आले, त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा पक्ष कुठला याचा विचार केला नाही. त्या मराठी माणूस म्हणून पाठिंबा जाहीर केला. त्याच धर्तीवर, पंतप्रधान पदासाठी मराठी चेहरा पुढे आला, तर शिंदे शिवसेनेसह भाजपनेही त्याला समर्थन दिले पाहिजे", असे आंधारे म्हणाल्या.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com