Devendra Fadnavis : फडणवीसांचे मुंबई पालिका आयुक्तांना आदेश; भरतीवरून आंदोलन पेटण्याआधीच खबरदारी

BMC Recruitment Clerk Post : लिपिक भरतीसाठी मुंबई महापालिकेने पहिल्या प्रयत्नात उत्तीर्णतेची अट घातल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : काही दिवसांपूर्वीच पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या भरतीवरून वाद निर्माण झाला आहे. त्यावरूनही विद्यार्थ्यांमध्ये रोष वाढण्याआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या 1 हजार 846 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदासाठी पालिकेने जाचक अटी घातल्या आहेत. दहावी व पदवी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असल्याची अट घालण्यात आली असून त्यावरूनच वाद निर्माण झाला आहे.

Devendra Fadnavis
Madhabi Puri Butch : माधबी बुच यांच्यावर संसदीय समिती घेणार ‘अ‍ॅक्शन’; शेअर बाजार कोसळला...

विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांसह विद्यार्थी संघटनाही त्यावरून आक्रमक झाल्या आहेत. ही अट रद्द करण्याची मागणी होत आहे. हे आंदोलन पेटण्याआधीच फडणवीसांनी ही अट रद्द करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहे.

पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिलेल्या पत्रात फडणवीस यांनी म्हटले आहे की, काही विद्यार्थी कौटुंबिक अथवा काही अपरिहार्य कारणांमुळे पहिल्या संधीत या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. परंतू, याचा अर्त ते विद्यार्थी हुशार नाहीत, असा होत नाही.

Devendra Fadnavis
Harayana Assembly : भाजपमध्ये भूकंप! दीड डझन नेत्यांनी फडकावलं बंडाचं निशाण

या अटींमुळे गुणवंत परंतु, पहिल्या संधीत परीक्षा उतीर्ण होऊ न शकलेल्या उमेदवारांमध्ये अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे उमेदवारांना या संधीचा लाभ घेता यावा यासाठी पदभरतीच्या पहिल्या संधीत उत्तीर्ण होण्याच्या अटी रद्द करण्यात याव्यात, असे आदेश फडणवीसांनी दिले आहेत.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही ही मागणी केली होती. जाचक अटी रद्द कराव्यात आणि उमेदवारांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ द्यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले होते. अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवून द्यावी, पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असल्याबद्दलची अट रद्द करावी, मराठी किंवा इंग्रजी यापैकी कोणतेही एकच टायपिंग प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे, आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागण्या त्यांनी केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com