BJP Candidate Death : मतदान होताच काश्मीरमध्ये दुर्दैवी घटना; भाजप उमेदवाराचा मृत्यू

Mushtaq Ahmad Bukhari Passes Away From Heart Attack in Jammu and Kashmir: मुश्ताक अहमद शाह बुखारी यांना भाजपने सुरनकोट मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.
Mushtaq Bukhari
Mushtaq BukhariSarkarnama
Published on
Updated on

Srinagar News : जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया मंगळवारी पार पडली. पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुर्दैवी घटना घडली आहे. सुरनकोट मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुश्ताक अहमद शाह बुखारी यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

बुखारी हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. सुरनकोट मतदारसंघातील ते भाजपचे उमेदवार होते. या मतदारसंघातील मतदान 25 सप्टेंबरला पार पडले आहे. काही दिवसांतच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. पण त्याआधीच बुखारी यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Mushtaq Bukhari
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल दोन दिवसांत सरकारी निवासस्थान सोडणार

सुरनकोट मतदारसंघ पुंछ जिल्ह्यातील आहे. बुखारी यांना राहत्या घरी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हृद्यविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.

असा होता राजकीय प्रवास

बुखारी हे सुरनकोट मतदारसंघातून दोनदा निवडून आले आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते नॅशनल कॉन्फरन्समध्ये होते. अब्दुल्ला सरकारमध्ये ते मंत्रीही होते. पण पहाडी समाजाला एसटीमधून आरक्षण देण्यावरून त्यांचे फारूख अब्दुल्लांसोबत मतभेद झाले होते. केंद्र सरकारने या समाजाला एसटीचा दर्जा दिल्यानंतर याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात बुखारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Mushtaq Bukhari
Caste Census : मुंबईतील ‘INDIA’ च्या बैठकीबाबत केंद्रीय मंत्र्यांचा गौप्यस्फोट; तेव्हा राहुल गांधी गप्प का होते?

बुखारी यांच्या प्रवेशानंतर त्यांचे सुरनकोटमधील तिकीट पक्के मानले जात होते. त्यानुसार भाजपने त्यांना उमेदवारीही दिली. त्यांचा विजयही जवळपास निश्चित मानला जात आहे. पण निकालाआधीच त्यांचा मृत्यू झाल्याने भाजप नेत्यांसह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांनी म्हटले आहे की, ‘बुखारी यांच्या निधनाविषयी ऐकून स्तब्ध आणि दु:खी झालो. राजौरी आणि पुंछ मधील समाजाची ही मोठी हानी आहे.’ माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहमूबा मुफ्ती यांनीही दु:ख व्यक्त केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com