Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल दोन दिवसांत सरकारी निवासस्थान सोडणार

Former Delhi CM Arvind Kejriwal will leave the government residence : दिल्लीचे दहा वर्षे मुख्यमंत्री राहिलेले अरविंद केजरीवाल सरकारी निवासस्थान पुढील दोन दिवसात सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रिकाम करणार आहेत.

केजरीवाल यांनी दिल्ली मुख्यमंत्रीपदाचा 17 सप्टेंबरला राजीनामा दिला होता. अरविंद केजरीवाल यांचा नवीन निवासस्थान दिल्लीतील विधानसभा असणार आहे.

अरविंद केजरीवाल पुढील दोन दिवसांत (Delhi) सिव्हिल लाइन्समधील 6, फ्लॅगस्टाफ रोड येथील मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करणार आहेत. केजरीवाल यांनी निवासस्थान खाली करण्यापूर्वी, असे सांगितले होते की, पितृपक्ष समाप्त होताच आणि नवरात्रोत्सव सुरू होताच, मुख्यमंत्री निवासस्थान सोडून नवीन ठिकाणी शिफ्ट होणार म्हणून. त्यानुसार पुढील दोन दिवसात केजरीवाल यांच्याकडून घर शिफ्टींगची कार्यवाही होणार आहे.

Arvind Kejriwal
Indian Army Chief Upendra Dwivedi : 'पेजर अ‍ॅटक इस्त्रायलचा मास्टरस्ट्रोक' ; भारत अशा हल्ल्यांपासून कसा वाचू शकतो?

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला (AAP) संपूर्ण बहुमत मिळाले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर केजरीवाल 2015 पासून शासकीय निवासस्थानी राहत होते. एका सभेत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचा मुख्यमंत्री असून देखील घर खरेदी करू शकलो नाही, असे म्हटलं होतं. "मुख्यमंत्री पदावर असताना खूप काही कमवता आले असते. पण ते करताना मी दिल्लीतील जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद मिळवले. हीच माझी खरी कमाई आहे", असे अरविंद केजरीवाल यांनी त्या सभेत म्हटले होते.

Arvind Kejriwal
Siddaramaiah : सिध्दरामय्या यांचा पत्नीबाबत मोठा दावा; म्हणाले, तो निर्णय आश्चर्यचकित करणारा!

दिल्लीचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी केजरीवाल गाझियाबादच्या कौशांबी भागात राहात होते. मुख्यमंत्री असताना ते मध्य दिल्लीतील टिळक लेनमध्ये असलेल्या घरात राहायचे. आम आमदी पक्षाने दिल्लीत फेब्रुवारी 2015 च्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने सत्तेवर आला. त्यावेळी केजरीवाल फ्लॅगस्टाफ रोडवरील निवासस्थानी राहायला गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com