election results 2024 : उत्तर प्रदेशपासून 1300 KM लांब जाऊन लढणाऱ्या अखिलेश यादवांच्या 'सायकल'ला J&K मध्ये किती यश मिळालं?

Jammu Kashmir Election Result 2024 : उत्तर प्रदेशापासून 1300 किलोमीटर लांब जम्मू अन् काश्मीरमध्ये 'सपा'नं नशिब आजमावलं होतं. मात्र, येथे 'सपा'च्या हाती निराशा आली आहे.
akhilesh yadav
akhilesh yadavsarkarnama
Published on
Updated on

हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीचे कल हाती येत आहेत. हरियाणात भाजप 'हॅट्ट्रिक' करताना दिसत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या ( एनसी ) आघाडीला बहुमत मिळालं आहे. मात्र, जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाला ( सपा ) मोठा झटका बसला आहे.

उत्तर प्रदेशातून बाहेर पाय पसरण्याची तयारी करण्यात असलेले 'सपा'चे अध्यक्ष अखिलेश यादव ( Akhilesh Yadav ) यांनी जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत 20 उमेदवार उतरवले होते. त्यात जम्मूतील 5 आणि काश्मीरमधील 15 जागांचा समावेश आहे. मात्र, समाजवादी पक्षाला एकही जागा मिळली नाही.

'सपा'ला निवडणुकीत फक्त 0.14 टक्के मते मिळताना दिसत आहेत. मतांची ही टक्केवारी नोटापेक्षाही कमी आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नोटाला 1.48 टक्के मते मिळाली आहेत. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला ( Bjp ) घाम फोडणाऱ्या 'सपा'साठी हा मोठा झटका मानला जात आहे.

akhilesh yadav
Vinesh Phogat Won : बहिणीला जे जमलं नाही ते विनेशनं करून दाखवलं! विधानसभेत थाटात एन्ट्री

'इंडिया आघाडी'त असलेल्या 'सपा'नं जम्मू-काश्मीरमध्ये 'एकला चलो रे'चा नारा देत 20 जागा लढल्या होत्या. बारामूला, बांदीपोरा, वगूरा क्रीरी, करनाह, पट्टन, कुपवाडा, गुलमर्ग, रफीबाद, त्रेहगाम, लोलाब, विजयपूर, पश्चिम उधमपूर, चेनानी, नागरोटा, हजरतबल, बडगाम, बीडवाह, हब्बाकदल, ईदगाह येथे 'सपा'नं उमेदवार उतरवले होते.

akhilesh yadav
Haryana Election Result 2024 : विरेंद्र सेहवागने ज्या उमेदवारासाठी हरियाणात 'बॅटिंग' केली, त्याचं काय झालं?

जम्मू-काश्मीरमध्ये काय चित्र?

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार स्थापन होणार आहे. ओमर अब्दुल्ला हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत भाजपला 30 जागाही मिळाल्या नाहीत. नॅशनल कॉन्फरन्स 42, काँग्रेस 6, भाजप 29, पीडीपी 3, अन्य 2 असे उमेदवार निवडून आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com