Sharad Pawar On National Politics: देशात पुन्हा जनता पक्षाचा प्रयोग होऊ शकतो; शरद पवारांच्या सूचक विधानाचा अर्थ काय ?

गेल्या काही महिन्यात देशभरातील काही प्रमुख नेत्यांनी शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी घेतल्याचेही पाहायला मिळाले.
National Politics
National Politics Sarkarnama
Published on
Updated on

National Politics : देशातील सत्तर टक्के जनतेने भाजपला नाकारलं असून काही राज्ये वगळली तर देशात इतर सर्वत्र भाजप विरहित सरकारे दिसून येतात. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, दिल्ली, पंजाब, झारखंड, हिमाचल प्रदेश अशा 70 टक्के ठिकाणी भाजप(BJP) सत्तेबाहेर आहे. पण जेव्हा देशाचा प्रश्न असतो तेव्हा नागरिकांना, प्रादेशिक पक्षांना महत्व दिले पाहिजे. नेतृत्व कोण करणार याची चिंता करू नका. दिवंगत इंदिरा गांधी इतक्या शक्तीशाली असतानाही आणीबाणी लागू केल्यानंतर जनतेने त्यांना नाकारलं आणि जनता पक्षाच्या हातात देशाची सत्ता दिली.ते आताही होऊ शकते, असे सूचक संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.

देशातील राजकीय परिस्थिती

गेल्या काही वर्षांपासून देशात एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून देशातील जनतेची सुरु असलेली वाताहत, केंद्रीय तपास यंत्रणांचे धाडसत्र, नोटबंदी, जीएसटी, समान नागरी कायदा, केंद्रीय यंत्रणांचा दबाव टाकून राज्यांमंधील सत्ता हस्तगत करणे, देशात सुरु असलेल्या दंगली, मणिपूर हिंसाचार, अशा एकापाठोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे देशातील जनतेत सध्या भितीचे वातावरण असल्याची टिका उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, काँग्रेस नेत राहुल गांधी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांसारख्या बड्या नेतेमंडळींकडून केली जात आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि भाजपला (BJP) देशातून हद्दपार करण्याच्या उद्देशाने देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने हालचालीही सुरु झाल्याचे दिसत आहे.

National Politics
Danve Letter to Koshyari : दानवेंचे कोश्यारींना पत्र ; "जागतिक गद्दार दिन" साठी 'युनो' कडे प्रयत्न करा..

देशातील राजकीय चित्र बदलण्यासाठी देशभरातील बड्या नेतेमंडळींमध्ये गेल्या काही महिन्यांपासून भेटीगाठी वाढल्या आहेत.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी,बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, यांच्यासह देशपातळीवर किंवा स्थानिक पातळीवर त्यांच्या प्रांतात भाजपाच्या विरोधात उभे आहेत. या गेल्या काही महिन्यात देशभरातील काही प्रमुख नेत्यांनी शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी घेतल्याचेही पाहायला मिळाले.भाजपला देशातून हद्दपार करण्यासाठी या बड्या नेतेमंडळींमध्ये अनेक खलबतंही झाली.आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने देशातील विरोधीपक्षांनी आपापल्या रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

देशातील ही परिस्थिती बदलण्यासाठी, 'देशातील सर्व विरोधकांची एकजूट झाली तर भाजपचा पराभव अटळ असल्याचं शरद पवार यांचं मत आहे. नेता न निवडता मोदींना (Narendra Modi) पर्याय देणं आवश्यक आहे. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, दिल्ली, पंजाब, झारखंड, यासारख्या राज्यामंध्ये स्थानिक पक्षांची सरकारे आहेत. प्रत्येक राज्यातील जनतेने जर स्थानिक पक्षांना ताकद दिली तर दक्षिणेतील राज्यांप्रमाणे संपूर्ण देशभरातून भाजप हद्दपार होऊ शकते, असही शरद पवार यांनी म्हटलं आहे

National Politics
Shivsena Foundation Day: शिवसेना पक्षाला शिवसेना हे नाव कुणी दिलं? काय आहे त्यामागचा इतिहास? वाचा!

कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर बोलताना शरद पवार म्हणाले होते की, देशात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना कर्नाटकमधील जनतेने धडा शिकवला.२०२४ मध्ये लोकसभा निवडणुकानंतर चित्र देशात काय चित्रं असू शकते, याचा अंदाज कर्नाटकच्या निकालांनी येऊ शकतो,असंही त्यांनी म्हटलं होतं.

तसेच , २०१९ मध्ये झालेल्या झारखंड विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य करताना पवार म्हणाले होते की, झारखंडसह, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राज्यस्थान या पाच राज्यांमधील जनतेने भाजप सरकारे हद्दपार झाले आहे.झारखंडमध्ये आदिवासी व गरीब लोकांची संख्या जास्तअसतानाही अशा परिस्थितीत भाजपने केंद्रातील सत्ता व आर्थिक ताकदीचा वापर करूनही भाजपला तेथील जनतेने नाकारले.या निकालाचा परिणाम अन्य राज्यांमध्येही दिसून येईल. या निकालांमधून भाजपच्या विरोधात एकतजूटीने सामना करायला एक विश्वास मिळाला असल्याचं विधान शरद पवार यांनी केलं होते.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com