Danve Letter to Koshyari : दानवेंचे कोश्यारींना पत्र ; "जागतिक गद्दार दिन" साठी 'युनो' कडे प्रयत्न करा..

Maharashtra Politics : या कांडात आपली भूमिका खूप महत्त्वाची राहिली आहे.
Danve Letter to Koshyari
Danve Letter to Koshyari Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : गेल्या वर्षी २१ जुलै, 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसोबत गद्दारी केली होती. त्यामुळे हा दिवस (२१ जुलै) हा जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करा, तशी घोषणा करा, अशी मागणी महाविकास आघाडीतील नेत्यांनी सरकारकडे केली आहे.

ठाकरेगटाचे नेते, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहिले आहे. हा दिवस जगभरात 'गद्दार दिवस' म्हणून साजरा करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे.

Danve Letter to Koshyari
Sadabhau Khot Slam Sanjay Raut : राऊत म्हणजे दादा कोंडके पार्ट टू ; सदाभाऊ खोतांनी उठवली खिल्ली

"गतवर्षी झालेल्या गद्दारीची दखल ३३ देशांनी घेतली होती, तर २१ जून रोजी जगभरात 'गद्दार दिवस' साजरा करण्यात यावा. या कांडात आपली भूमिका खूप महत्त्वाची राहिली आहे. आपल्यामुळे नावारूपाला आलेल्या या दिवसाला साजरा करण्यासाठी आपण आपले दिल्लीचे पातशाह यांच्या मार्फत संयुक्त राष्ट्राकडे पाठपुरावा, मागणी करावी. हे माझे आपणास आवाहन आहे," असे पत्र दानवे यांनी कोश्यारींना पाठविले आहे.

शिंदे गटाने वर्धापन दिन साजरा करण्यापेक्षा ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा करावा, असा खोचक सल्ला रविवारी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिला. शिंदे गटाच्या गद्दारीची नोंद जगातील ३३ देशांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांनी ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा करून, त्यांनी किती निर्लज्जपणे गद्दारी केली होती, हे लोकांना दाखवून द्यावं, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी टीकास्र सोडलं.

Danve Letter to Koshyari
Dhule Lok Sabha constituency : भाजपच्या खासदाराला माजी पोलीस अधिकाऱ्याचे आव्हान ; निवडणूक लढविणारच..

अंबादास दानवे आपल्या पत्रात म्हणतात..

आपण महाराष्ट्राचे राज्यपाल असताना अनेकवेळा आपल्या भेटीगाठी झाल्या आपण महाराष्ट्रात असताना ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारला वारंवार जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम अविरत चालू ठेवले होतेच ! ते कमी झाले की काय म्हणून महाराष्ट्रात आपल्या दिल्लीच्या पातशहाच्या मार्गदर्शनाखाली सूर्याजी पिसाळ, खंडूजी खोपडे यांच्या गद्दारीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात गद्दारीचे पीक फोफवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली , याची परिणती २० जून २०२२ रोजी शिवसेना पक्षातून ४० आमदारांनी गद्दारी करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे पाप केले . ही गद्दारी जाणून घेण्यासाठी जगातील ३२-३३ देशांनी माहिती घेतली . जर अशा गद्दारीची जगातील एवढ्या देशातील जनतेचे लक्ष वेधले जात असेल तर हा दिवस " जागतिक गद्दार दिन " साजरा होवू शकतो , तो व्हावा म्हणून आपण आपल्या दिल्लीच्या पातशहांमार्फत " युनो " कडे प्रयत्न करावे , अशी मी आपणास विनंती करतो.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com