
Jaya Bachchan News : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभात मौनी अमावस्येच्या दिवशी चेंगराचेंगरीची घटना घडली आणि यामध्ये 30 भाविकांचा मृत्यू आणि अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आता या मुद्य्यावरून राजकीय वातावरणही तापलेलं आहे. हा मुद्दा संसदेतही उचलला गेला आहे. याचदरम्यान आता समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांचं एक वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. त्यांनी संसद परिसरात मीडियाशी बोलताना महाकुंभातील पाणी सर्वात प्रदूषित असल्याचं म्हटलं आहे.
जया बच्चन(Jaya Bachchan) म्हणाल्या, संसदेत या क्षणी जलशक्ती विभाग घाण पाण्यावर चर्चा करत आहे. या क्षणी पाणी सर्वात जास्त प्रदूषित कुठं आहे? ते कुंभमध्ये आहे. चेंगराचेंगरीत मेलेल्यांचे मृतदेह नदीत फेकले आहेत. ज्यामुळे पाणी प्रदूषित झालं आहे. वास्तविक मुद्य्यांवर लक्ष दिले जात नाही. तसेच, त्यांनी म्हटले की मृतदेह गंगेत फेकली गेली आणि तेच पाणी लोकांपर्यंत आले आहे.
राज्यसभा(Rajya sabha) खासदार जया बच्चन म्हणाल्या, महाकुंभ मेळ्यास येणाऱ्या सर्वसामान्यांना काही विशेष सुविधा मिळत नाहीत. त्यांच्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. शिवाय जया बच्चन यांनी सरकारद्वारे जारी करण्यात आलेली आकडेवारीही खोटी म्हटले आहे. ज्यात दावा केला जात आहे की, आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी आस्थेची डुबकी मारली. यावर जया बच्चन म्हणाल्या, ते(सरकार) खोटं बोलत आहेत, की कोट्यवधी लोक त्या ठिकाणी आले. कोणत्याहीवेळी एवढ्या मोठ्या संख्येत लोक तिथे एकत्र कसे काय येऊ शकतात?
याशिवाय जया बच्चन यांनी म्हटले की, व्हीआयपी लोक महाकुंभ मेळ्यात स्नानासाठी जातात. त्यांना स्पेशल ट्रीटमेंट मिळते. त्यांचे फोटोही येतात. जे गरीब लोक आहे, जे सर्वसामान्य लोक आहेत. त्यांच्यासाठी काही मदत नाही, कोणतीही व्यवस्था नाही. कंटँमिनेटड पाणी सर्वात दूषित पाणी आहे, ज्यावर तुम्ही मागणी करत आहात. अऱे खरं सांगा, लोकांना कळू द्या की, महाकुंभमध्ये काय झालं? सभागृहात बोललं पाहीजे. कृपया देशातील लोकांना महाकुभंमध्ये झालेल्या घटनेबाबत खरं सांगा. जो तपास सुरू आहे, तो सुरूच राहतो. महाकुंभात जे काही घडत आहे, त्याचा तपास होणं गरजेचं आहे.
जया बच्चन यांच्या या वक्तव्यावर नवा वाद उफाळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे महाकुंभमध्ये कथित गैरव्यवस्थापनाच्या मुद्य्यावर तत्काळ चर्चा केली जावी अशी मागणी करत विरोधी पक्षांनी राज्यसभेत जोरदार राडा घातला. मात्र सभापतींकडून त्यांची मागणी फेटाळण्यात आल्यानंतर विरोधकांनी संतप्त होत सभात्यागही केला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.