Nitish Kumar : नितीश कुमारांना पंतप्रधानपदाची ऑफर; ‘इंडिया’च्या प्लॅनिंगचा भांडाफोड

Lok Sabha Election 2024 Result NDA India Alliance Nitish Kumar KC Tyagi : भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता न आल्याने इंडिया आघाडीने एनडीएतील घटक पक्षांना चुचकारण्याचा प्रयत्न केला होता.
Nitish Kumar Rahul Gandhi
Nitish Kumar Rahul GandhiSarkarnama

New Delhi : लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपच्या विरोधात गेल्यानंतर इंडिया आघाडीतील काही नेत्यांनी एनडीएतील घटक पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. इंडियातील नेत्यांकडून आधी हे दावे फेटाळले जात होते. पण आता आघाडीकडून नितीश कुमारांना थेट पंतप्रधानपदाची ऑफर दिल्याची धक्कादायक समोर आली आहे.

बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांच्या पक्षाला 12 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे एनडीएतील महत्व वाढले आहे. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशचे भावी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हेही किंगमेकर ठरले आहेत.

दोन्ही बाबूंना एनडीएतून फोडून आपल्या गोटात घेण्यासाठी इंडिया आघाडीकडून प्रयत्न झाल्याच्या बातम्या निकालाच्या दिवसापासून येत होत्या. त्याला नितीश कुमार यांच्या पक्षाचे नेते के. सी. त्यागी यांनी दुजोरा दिला आहे. आघाडीकडून नितीशबाबूंना पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आली होती. पण त्यांनी ही ऑफर नाकारल्याचा दावा त्यागी यांनी शनिवारी केला.

त्यागी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, इंडिया आघाडीकडून नितीश कुमारांना पंतप्रधानपदाची ऑफर आली होती. त्यांना आघाडीचे संयोजक होण्यापासून रोखणाऱ्या नेत्यांनीच ही ऑफर दिली होती. नितीश कुमारांनी ही ऑफर नाकारली. आम्ही एनडीएसोबत आहोत, असे त्यागींनी सांगितले. मात्र, ऑफर दिलेल्या नेत्याचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला.

Nitish Kumar Rahul Gandhi
Chandrababu Naidu-Narendra Modi : चंद्राबाबूंनी मोदींना दोनदा दिला होता जोरदार झटका; नेमकं काय घडलं?

काही नेते नितीश कुमार यांच्याशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. पण आघाडीमध्ये असताना त्यांना आणि आमच्या पक्षाच्या नेत्यांना मिळालेली वागणूक चांगली नव्हती. त्यामुळे आम्ही आघाडीतून बाहेर पडलो. आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो. आता मागे वळून पाहण्याचा प्रश्नच नाही, असेही त्यागी यांनी स्पष्ट केले.

लोकसभेच्या निवडणुकीत एनडीएला 293 जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये भाजपला 240 जागा मिळाल्याने स्वबळावर बहुमताचा आखडा गाठण्यासाठी 32 जागा कमी पडल्या. त्यामुळे भाजपला सत्तास्थापनेसाठी नितीश कुमार आणि चंद्राबाबूंवर अवलंबून राहावे लागले आहे. चंद्राबाबूंच्या पक्षाला आंध्र प्रदेशात 16 जागा मिळाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com