Nitish Kumar Politics : बिहारमध्ये वर्षअखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे. विविध घटकांतील मतदारांना आकर्षित करण्यासाठी ते सातत्याने नवीन योजनांची घोषणा करत आहेत. पण असे असले तरी एक कळीचा मुद्दा त्यांच्या डोक्याचा ताप वाढू शकतो, असे संकेत त्यांच्याच पक्षातील आमदाराने दिले आहेत.
नितीश कुमार यांचे पुत्र निशांत हे सध्या राजकारणापासून दूर आहेत. मात्र, आगामी निवडणुकीत ते उमेदवार म्हणून दिसतील, अशी जोरदार चर्चा आहे. त्यावरून एका जेडीयू आमदार गोपाल मंडल यांनी पुन्हा एकदा त्यांनी निवडणूक लढविण्याची मागणी करताना खळबळजनक दावा केला आहे.
निशांत कुमार हे जेडीयूमध्ये सक्रीय न झाल्यास आणि निवडणूक न लढल्यास पक्ष फुटेल, असा धक्कादायक दावा मंडल यांनी केला आहे. जेडीयूचे अनेक नेते भाजप, आरजेडी, लोकजनशक्ती आणि इतर पक्षांमध्ये पळून जातील, असा दावा मंडल यांनी केला आहे. निशांत कुमार यांना आम्ही पक्षात आणले तर पक्ष वाचेल, असेही ते म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मानसिक स्थितीविषयी बोलताना मंडल म्हणाले, ते पूर्णपणे स्वस्थ आहेत. ते मला पसंत करत आणि करत राहतील. मीही बिहारचा जावई आहे. वाईट काळापासून नितीश कुमार यांच्यासोबत आहे. आम्ही राष्ट्रीय जनता दलाकडून नव्हे, जेडीयूकडून निवडणूक लढवू. पण हो लालूप्रसाद यादव यांच्यासोबत माझे नाते चांगले आहे, अशी कबुलीही मंडल यांनी दिली.
दरम्यान, प्रशांत किशोर यांच्याविषयीही मंडल यांनी प्रतिक्रिया दिली. नितीश कुमार पुढील पाच वर्षांसाठी बिहारचे मुख्यमंत्री असतील, असे सांगत मंडल म्हणाले, प्रशांत किशोर हे केवळ प्रचारक आहे. बिहारमध्ये ते हवा करत आहेत, पण प्रत्येक मतदारसंघात त्यांचा पराभव होईल. लोकांना पैसे, जेवण देऊन गर्दी जमवतात. बिहारमध्ये त्यांना कोण ओळखते, असा प्रश्न करत मंडल यांनी प्रशांत किशोर यांना टोला लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.