
Maharashtra Agrarian Crisis : राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. सभात्यागही केला. आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही हा मुद्दा तापवला असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत शेतकरी आत्महत्येकडे देशाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी म्हटले आहे की, विचार करा, केवळ तीन महिन्यांत महाराष्ट्रात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. हा फक्त आकडा आहे का? नाही. ही उघड्यावर आलेली 767 कुटुंब आहे. 767 कुटुंब, जी कधीच सावरणार नाहीत. आणि सरकार गप्प आहे. केवळ बघत आहे.
शेतकरी प्रत्येक दिवशी कर्जात अधिकच बुडत चालला आहे. बियाणे महाग आहेत, खेत महाग आहे, डिझेल महाग आहे, पण एमएसपी ची काही गॅरंटी नाही. कर्ज मागायला गेल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, असे राहुल यांनी म्हटले आहे. ज्यांच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत, त्यांचे कर्ज मात्र मोदी सरकार आरामात माफ करते. आजची बातमी बघा, अनिल अंबानींचा 48 हजार कोटींचा एसबीआय घोटाळा, अशी टीका राहुल यांनी केली आहे.
मोदींवर निशाणा साधताना राहुल म्हणाले, मोदींनी म्हटले होते की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू. पण आज असे हाल आहे की, शेतकऱ्यांचे आयुष्यच अर्ध होत आहे. ही यंत्रणा गपचुपपणे पण सातत्याने शेतकऱ्यांना मारत आहे आणि मोदी आपल्या पीआरचा तमाशा पाहत आहेत, अशा शब्दांत राहुल गांधींनी पंतप्रधानांवर टीका केली.
दरम्यान, विरोधकांकडून अधिवेशनातही शेतकरी आत्महत्येचा मुद्दा उचलून धरण्यात आला होता. तसेच शेतकऱ्यांशी संबंधित इतर मुद्द्यांवरूनही विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त विधानावरूनही विरोधकांनी सरकारला घेरले होते. याच चर्चेदरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले यांचे एक दिवसासाठी निलंबन झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.