American President : अमेरिकन लोकांच्या मनात राष्ट्राध्यक्ष म्हणून पुन्हा 'डोनाल्ड ट्रम्प' ?

American Presidential Election : सर्वेक्षणात जो बायडेन यांना मोठा धक्का ; धोरणांबाबत अमेरिकेत प्रचंड नाराजी..
Donald Trump, Jeo Biden
Donald Trump, Jeo BidenSarkarnama
Published on
Updated on

American President : अमेरिकेतील जनतेने राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत आपला 'कल' सांगितला आहे. यावेळी अनेक राज्यांतील लोकांना ट्रम्प निवडणूक जिंकतील असा विश्वास असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आला आहे. पुढील वर्षी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत.

दरम्यान, अमेरिकेच्या निवडणुकीदरम्यान काही राज्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे जो बायडेन (Joe Biden) यांच्यापेक्षा पुढे असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. CNN च्या सर्वेक्षणानुसार, ट्रम्प हे ॲरिझोना, मिशिगन, जॉर्जिया, नेवाडा, विस्कॉन्सिन आणि पेनसिल्व्हेनियामधील लोकांची पहिली पसंती आहेत.

Donald Trump, Jeo Biden
Congress News: तेलंगणाप्रमाणे काँग्रेस आतातरी मरगळ झटकणार की नाही...?

ही तीच राज्ये आहेत ज्यात 2020 च्या निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव झाला होता. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना जो बायडेन यांच्यापेक्षा 5 टक्के जास्त मते मिळू शकतात, असे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. याशिवाय मिशिगनमध्ये ट्रम्प यांना बायडेन पेक्षा 10 टक्के जास्त मते मिळू शकतात. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासाठी ही निवडणूक सोपी असणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कारण, त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. बायडेन यांच्या धोरणांबाबत अमेरिकेत प्रचंड नाराजी आहे. लोकांचा असा विश्वास आहे की बायडेनची धोरणे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभावी ठरली नाहीत. याशिवाय, बिडेन यांची आर्थिक बाबतीतली धोरणेही अमेरिकन (American) जनतेला फारशी आवडलेली नाहीत.

(Edited by Amol Sutar)

Donald Trump, Jeo Biden
Antarwali Sarati Meeting : महाजनांनी जरांगेंना काय सांगितले...‘आता देवसुद्धा मराठ्यांना ओबीसीत येण्यापासून रोखू शकत नाही’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com