Hemant Soren: हेमंत सोरेन यांचं वय 5 वर्षांत 7 वर्षे वाढले! नेमकी गडबड काय आहे?

Jharkhand Assembly Election: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या वयावर भाजप उमेदवाराने आक्षेप घेतला आहे.
Hemant Soren
Hemant SorenSarkarnama
Published on
Updated on

Ranchi News : झारखंड विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. त्यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर भाजप उमेदवाराकडून आक्षेप घेण्यात आले आहेत.

मागील पाच वर्षांत सोरेन यांचे वय सात वर्षे कसे वाढले, असा सवाल भाजपकडून करण्यात आला आहे. उमेदवारी अर्जामध्ये सोरेन यांनी त्यांचे वय वाढवून दाखवले असल्याच दावा भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे सोरेन यांची उमेदवारी अडचणीत आली आहे.

Hemant Soren
Eknath Shinde : श्रीनिवास वनगांना तिकीट का नाकारले? एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच सांगितले कारण...

भाजपचे प्रवक्ते प्रतुल शाहदेव यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहेत की, ‘पाच वर्षांत एखाद्याचे वय 7 वर्षे वाढल्याचे कधी ऐकले आहे का?’ झारखंड सरकारच्या संकेतस्थळानुसार, मुख्यमंत्री सोरेन यांचे वय 49 वर्षे इतके दाखवण्यात आले आहे. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञामध्ये त्यांचे वय 42 वर्षे दाखविण्यात आले होते.

सोरेन यांचा बरहेट हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गमालियल हेंब्रम यांनी त्यांच्या वयाबाबत तक्रार केली आहे. सोरेन यांनी वय वाढवून सांगितल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच जमीन आणि पत्नीच्या नावावर असलेल्या मोटारीची माहिती त्यांनी लपवल्याचा दावाही हेंब्रम यांनी केला आहे.

Hemant Soren
Eknath Shinde : श्रीनिवास वनगांना तिकीट का नाकारले? एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच सांगितले कारण...

हेंब्रम यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, हेमंत सोरेन यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी आपले वय 42 वर्षे सांगितले होते. आता 2024 मध्ये म्हणजे पाच वर्षांनी त्यांचे वय 47 वर्षे असायला हवे. पण त्यांनी ते 49 वर्षे सांगितले आहे. एखाद्या व्यक्तीचे वय पाच वर्षांत सात वर्षे कसे वाढू शकते, असा सवाल हेंब्रम यांनी उपस्थित केला आहे.

2019 मध्ये सोरेन यांनी दोन जागांबाबत माहिती दिली होती. ही जमीन 2006 आणि 2008 मध्ये विकत घेतली होती. पण 2024 च्या निवडणुकीसाठी दाखल प्रतिज्ञापत्रामध्ये 23 जमिनींचा उल्लेख करण्यात आला आहे. या जमिनी 2006 ते 2008 मध्ये विकत घेतल्याचे दाखवण्यात आले आहे. आधीच 23 जागा विकत घेतल्या होत्या तर त्याची माहिती 2019 च्या अर्जासोबत का दिली नाही, असा आक्षेप भाजप उमेदवाराने घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com