Jharkhand Election: काँग्रेसला मोठा धक्का; माजी कार्यकारी अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Manas Sinha exits Congress citing repeated insults: काँग्रेसने आपला चारवेळा अपमान केल्याचा आरोप करत मानस सिन्हा यांनी रविवारी रात्री उशिरा पक्षाला रामराम ठोकला आहे.
Manas Sinha
Manas SinhaSarkarnama
Published on
Updated on

Ranchi News : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे माजी कार्यकारी अध्यक्ष मानस सिन्हा यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे राज्यात भाजपची ताकद वाढली आहे.

मानस सिन्हा यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहून रविवारी रात्री राजीनामा दिला होता. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, मागील २७ वर्षांपासून मी काँग्रेससोबत जोडलो गेलो होतो. पक्षाने जे काम दिले ते प्रामाणिकपणे केले. पण माझ्या मेहनतीला पक्षाने महत्व दिले नाही.

Manas Sinha
Thalapathy Vijay : थलपती विजयच्या पहिल्या सभेला प्रचंड प्रतिसाद; 'DMK'वर केला गंभीर आरोप!

काँग्रेसने सिन्हा यांनी उमेदवारी न दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, मला पक्षाने चौथ्यांदा अपमानित केले आहे. सहन करण्याचीही मर्यादा असते. आता सहनशक्ती संपली आहे. आतापर्यंत काँग्रेसचा विचार करत होतो, आता माझा विचार करणार आहे. त्यामुळे मी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे.

सिन्हा यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. आसामचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड भाजपचे प्रभारी हिमंता बिस्वा सरमा यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. त्यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

Manas Sinha
Rahul Gandhi : मुंबईत चेंगराचेंगरी अन् राहुल गांधींना झाली शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आठवण...

 दरम्यान, झारखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय जनता दलाची आघाडी झाली आहे. राज्यात दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

उमेदवार निवडताना यावेळी काँग्रेसने दलबदलू किंवा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना उमेदवारी देणे टाळले आहे. स्थानिक भागात काम करणाऱ्या नेत्यांचा तिकीटा वाटपात विचार केल्याचे दिसते. मागील निवडणुकीत अनेक दलबदलू उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाले होते. त्यामुळे झाऱखंड मुक्ती मोर्चाने काँग्रेसवर दबाव टाकत काही जागा आपल्याकडे घेतल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com