नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) सत्तेत असलेल्या आणखी एका राज्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. पंजाब, छत्तीसगड, राजस्थानपाठोपाठ आता झारखंडमध्ये (Jharkhand) आघाडीत बिघाडीत झाल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच प्रहार केला आहे. मुख्यमंत्री झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन (Hemant Soren) हे काँग्रेसला दुबळे करत असल्याचा आरोप मंत्र्यांनी केला आहे.
झारखंड सरकारमध्ये सोरेन यांच्यासोबत काँग्रेसने आघाडी केली आहे. सरकारमधील आरोग्य मंत्री व काँग्रेसचे नेते बन्ना गुप्ता (Banna Gupta) यांनी सोरेन यांच्यावरच टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबीरात त्यांनी ही टीका केली. यावेळी त्यांनी एका हिंदी गाण्याच्या माध्यमातून पक्षाची राज्यातील स्थिती सांगत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
गुप्ता म्हणाले, आपलं आघाडीचं सरकार आहे. यामध्ये आपलं स्थान ‘जब मांझीही नाव डुबाये, उसे कौन बचाये’, अशी आहे. जर मुख्यमंत्र्यांना आपला पक्ष (काँग्रेस) दुबळा व्हावा असं वाटत असले तर सरकारमध्ये राहण्यात काहीच अर्थ नाही. ते काँग्रेसची ताकद असलेल्या भागात आपल्याच पक्षाचा विस्तार करत आहेत. काँग्रेस पक्ष टिकला तरच आपला निभाव लागेल, असंही गुप्ता म्हणाले.
पक्षाची तत्व आणि विचारधारेशी कटिबध् राहण्याचा आवाहनही गुप्ता यांनी पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना केले. मंत्री म्हणून वावरताना मलाही आनंद होते. हे कोणाला आवडणार नाही? पण जमशेदपूरसारख्या शहरात आपल्याला एक लाख मतं मिळाली, यामुळे आम्ही मंत्री झालो. त्यामुळे पक्षाच्या विचारधारेशी तडजोड करू नये, असे गुप्ता म्हणाले.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता यांच्यासह इतर काही नेत्यांनीही आघाडी सरकारच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता झारखंडमध्येही काँग्रेस सरकारमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याचे मानले जात आहे. याआधीही काही नेत्यांनी मुख्यमंत्री सोरेन यांच्यावर टीका केली होती. हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.