
Jharkhand : झारखंडमध्ये सुरू असलेली राजकीय उलथापालथ थांबण्याचे नाव घेत नाही. झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली खरी पण सरकार टिकवण्यासाठी त्यांना मोटी कसरत करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या पक्षाच्या दोन आमदारांनी सोरेन यांचे टेन्शन वाढवले आहे. ते दोघेही बहुमत चाचणीलाच दांडी मारणार असल्याची जोरदार चर्चा आहे. (Jharkhand Political News)
झारखंडमध्ये विधानसभेचे 81 आमदार आहे. त्यापैकी 47 आमदार आपल्या पाठिशी असल्याचा दावा चंपई सोरेन यांनी केला आहे. 'जेएमएम'सह काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रीय जनता दलाचे राज्यात आघाडी आहे. जेएमएमने (JMM) जवळपास 38 खासदारांना हैद्राबादला हलवले आहे. नव्या सरकारची पाच फेब्रुवारीला बहुमत चाचणी आहे. यावेळी सर्व आमदार थेट विधिमंडळात येणार आहेत.
हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या अटकेनंतर राज्यात निर्माण झालेली राजकीय स्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह आहेत. बहुमतसाठी चंपई सोरेन यांना 41 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. ते 47 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगत असले तरी त्यांच्याच पक्षातील आमदार उघडपणे नाराजी व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे सरकार बहुमताचा आकडा गाठणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माझं ऐकलं असतं तर तुरूंगात गेले नसते
जेएमएमचे आमदार लोबिन हेमब्रूम यांनी थेट हेमंत सोरेन यांच्यावर टीका केली आहे. सोरेन यांनी जमिनींशी संबंधित कायद्यांबाबत आपले ऐकले असते तर ते जेलमध्ये गेले नसते, असे विधान बेमब्रूम यांनी केले आहे. भूखंड प्रकरणात अनेक अनियमितता आहेत. आयएएस अधिकाऱ्यांचा त्यात सहभाग आहे. आता लोकं तुरुंगात जात आहे. आमचे माजी मुख्यमंत्रिही जेलमध्य गेले, असे हेमब्रूम म्हणाले.
मी हेमंत सोरेन यांना आधीच इशारा दिला होता. त्यांच्याभोवतीचे काही लोक त्याची प्रतिम मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्यांना सतर्क केले होते. मी मुर्खाप्रमाणे काहीही बोलत असल्याचे सांगत त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. विरोधकांनी हीच संधी साधली. त्यांनी माझा सल्ला ऐकला असता तर आज हा दिवस आला नसता, असे हेमब्रूम म्हणाले. सरकारने विमानतळ, धरण, उद्योगाच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी हिसकावून घेतल्याची टीकाही त्यांनी केली. त्यामुळे हेमब्रूम उद्या बहुमत चाचणीला हजर राहणार नसल्याची चर्चा आहे.
'जेएमएम'चे दुसरे आमदार चामरा लिंडा हेही नाराज असल्याचे समजते पक्षाच्या त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे समोर आले आहे. पक्षाच्या बैठकांनाही ते हजर नव्हते. ते आजारी असल्याचे पक्षातील नेते सांगत आहेत. पण त्यांच्याशी नेत्यांचा संपर्कच होत नाही. लिंडा यांनी यापूर्वी आपल्याच सरकारवर टीका केली होती. आदिवासींच्या विकासाठी सरकारने काहीच काम केले नाही, असे म्हणत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.